• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वडी येथे श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह; ३० मार्चला भव्य पालखी सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे वडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २४ मार्च ते ३१ मार्च २०२६ दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार असून परिसरातील भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.

या सोहळ्याचे मार्गदर्शन गणेश महाराज कुटे यांचे लाभत असून श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते म्हणून अशोकजी महाराज ताल्डे वडीकर उपस्थित राहणार आहेत. सप्ताहाचे हे २९ वे वर्ष असून विविध धार्मिक, भजन, कीर्तन व पारायण कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी १ ते ४ भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ तसेच रात्री ९ ते ११ हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.

सप्ताहात शिवदास महाराज जंगले, भागवत महाराज नखाते, पांडुरंग महाराज मुंजाळ, अन्सीराम महाराज चव्हाळकर, संतोष महाराज पवार, दीपक महाराज मेटे व रोहिदास महाराज मस्के हे कीर्तनकार आपली सेवा देणार आहेत.

दि. ३० मार्च रोजी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत आळंदी येथील उमेश महाराज दशरथे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहासाठी कुटे पाटील मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून विविध भजनी मंडळे, गावकरी व नवयुवक मित्र मंडळ वडी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन, भागवत कथा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

उज्वल यशाची अखंडित परंपरा! देवनांद्रा साकाप शाळेचे नवोदय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश

Next Post

अवैध वीटभट्ट्यांवर १५ दिवसांत कारवाईची हमी; आत्मदहनाचा इशारा मागे, आंदोलन स्थगित

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post
अवैध वीटभट्ट्यांवर १५ दिवसांत कारवाईची हमी; आत्मदहनाचा इशारा मागे, आंदोलन स्थगित

अवैध वीटभट्ट्यांवर १५ दिवसांत कारवाईची हमी; आत्मदहनाचा इशारा मागे, आंदोलन स्थगित

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In