• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 12, 2026
in खेळ
0
राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

ठाणे येथे झालेल्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी; यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा, प्रतिनिधी :

RelatedPosts

पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वतीबाई भालेपाटील विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

ठाणे येथे दि. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबची मल्लखांब व रोप मल्लखांबपटू कु. अदिती चांदगुडे हिने उल्लेखनीय कामगिरी करत सांघिक कांस्यपदक पटकावले. तिच्या या यशामुळे करमाळ्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेत अदितीने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे, जिद्दीचे आणि मेहनतीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तिच्या प्रभावी कामगिरीमुळे संघाच्या यशात मोलाची भर पडली. राज्यस्तरावर सांघिक कांस्यपदक मिळवून तिने आपल्या खेळातील गुणवत्ता सिद्ध केली असून, तिच्या या यशामुळे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अदितीला क्रीडा शिक्षक प्रा. राम काळे सर यांचे मार्गदर्शन, तर प्रशिक्षक सागर शिरसकर सर यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अदितीने सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. या यशामागे तिच्या परिश्रमांसोबतच प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शनही महत्त्वपूर्ण ठरले.

अदितीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. माने, उपप्राचार्य अनिल साळुंखे, प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक यांच्यासह त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी आणि हितचिंतकांनी तिचे अभिनंदन केले.

तसेच अदितीला मार्गदर्शन करणारे प्रा. राम काळे सर आणि प्रशिक्षक सागर शिरसकर सर यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. अदितीने भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात यशाची नवनवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Ad 1
Tags: Jitendra Chandgude
Previous Post

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

Related Posts

पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!
खेळ

पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!

November 1, 2026
16
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वतीबाई भालेपाटील विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश
खेळ

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वतीबाई भालेपाटील विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश

October 31, 2026
5
शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 30, 2026
10
धारासूरच्या भूमिपुत्राची महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड!
खेळ

धारासूरच्या भूमिपुत्राची महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड!

October 29, 2026
19
खेळ

मायणीच्या प्राथमिक शाळेतील मुलींची बाल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी

October 29, 2026
3
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी
खेळ

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

October 22, 2026
20

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक

November 12, 2026
कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

November 12, 2026

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

November 12, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In