लाखांदूर:- क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया यांच्या सयुक्त विद्यामने क्रीडा संकुल गोंदिया येथे (दि.२४) घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामधे १४ वर्षीय वयोगटातील जिल्हा परिषद विद्यालय नवेगाव बांध येथील मुलांनी सालेकसा तालुका २/० व देवरी तालुक्याच्या चमूना २/० नी पराजित करून प्रथम स्थान पटकावलं आहे. चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यात प्रामुख्याने रुद्राक्ष देवा सोंनटक्के,तन्मय एकनाथ अत्तरगडे,दानिश मेहबूब पठान , निखिल सुभाष आगाशे,दानिश आरिफ सेख, आदित्य विलास लाडे,धीरज यादोराव भोंडे, सुशील सुरेश सयाम,रुपेश यदोराव शहारे, कुणाल मुकेश चाफेकर स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांच्या विजयाबद्दल जी.प.कनिष्ठ महाविद्यालयाच्या शाळा समिती अध्यक्षा तथा जी.प . सदस्या सौ. रचनाताई गहाने यांनी अभिनंदन करून मुलांना नवीन ड्रेसकिट तर नवेगाव बांध सामाजिक कार्यकर्ते अमृतलाल टांग यांच्याकडून मुलांना लोअर देण्यात येणार आहेत.
दोन्ही मान्यवरांनी विजयी चमुना पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील स्पर्धेत विजयाच्या शुभेच्या दिलं. विजयी चमुचे जी.प.महाविद्यालयाचे प्राचार्य करचाल सर, क्रीडा शिक्षक शेंडे सर,मारवाडे सर यांनी परिश्रम घेतले.
विजयी चमुचे मुजफ्फर पठान मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय डोये, तं.मु.स.तथा सेवा फाऊंडेशनचेअध्यक्ष हरिश्चंद्र चांदेवार,नवेगाव बांध फाऊंडेशनचे सचिव रामदास बोरकर, सेवा फाऊंडेशनचे नीलमचंद पंधरे, संजीव बडोले सर,प्रभाकर पुस्तोडे,संजय परसुरामकर, देवराम पुस्तोडे, राजू वलथरे,खुशाल डोंगरवार सर , हरीचंद्र लाडे सर,नाजूक डोंगरावर,जगदीश मेश्राम,अली सैयद,दीपक शिरसागर,सचिन ठाकरे,अमित शहारे,राहुल नरूले,अजय बडोले,अतुल येरणे,जय गाढवे,सागर राऊत,सुब्बा सोनटक्के,वीरेंद्र येरने,धीरज नेवारे,अर्पित खंडाईत,शहारे इत्यादींनी अभिंनदन केले.
खुशाल डोंगरवार प्रतिनिधी
7588789975
9158573180
Discussion about this post