प्रीतिनिधी :-विजय कानडे
सुरगाणा नगरपंचाय विविध विषय समितीच्या सभापदाची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
पिठासीन अधिकारी तथा सुरगाणा तहसीलदार राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली सुरगाणाचे मुख्य अधिकारी यांनी सहाय्य केले.
विविध समितीच्या निवडण्यात आलेल्या सभापती पुढील प्रमाणे –
सार्वजनिक बांधकाम सभापती- विजय धनराज कानडे
स्वच्छता आरोग्य शिक्षण समिती सभापती संजय लक्ष्मण पवार पाणीपुरवठा जल निसारण समिती सभापती – सचिन रमेश आहेर महिला बालकल्याण सभापती प्रमिला भोये नियोजन व विकास समिती यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीला नगराध्यक्ष भरत वाघमारे, माधवी थोरात उपनगराध्यक्ष रंजनाताई लहरे भाजपा सचिन आहेर शिंदे गटनेते जानकीबाई देशमुख , जयश्री शेजुळे, सचिन महाले, पुष्पाताई वाघमारे, अरुणा वाघमारे, राधाबाई वाघमारे, अमृता ताई पवार, योगिता पवार, राजू शेख, मालती ताई खांडवी, नगरसेवक व नगरपंचायत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते निवडलेल्या सर्व सभापतींचा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी सत्कार केला व निवडणूक सुरळीत पार पडली.
Discussion about this post