फुलंब्री प्रतिनिधी अमोल कोलते फुलंब्री तहसील कार्यालयाच्या सभागृहात सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा आमदार नारायण कुंचे यांनी शनिवार (28 सप्टेंबर) रोजी घेतला. यामध्ये जलजीवन मिशन, रोजगार हमी योजना कामाच्या. संजय गांधी निराधार योजना ,शेतकर्यांचे पिकाचे नुकसान सर्व समस्या तहसील, पंचायत समिती, कृषी विभाग, आदींसह इतर सर्व शासकीय कार्यालयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली.
फुलंब्री तालुक्यातील कोलते टाकळी, रिधोरा देवी, धानोरा आणि तळेगाव ही गावे बदनापूर विधानसभा मतदार संघातील असून गावातली समस्या मार्गी सोडविण्या करिता फुलंब्री तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजना, शेतकरी यांच्या समस्या ,पिक विमा ,अनेक प्रश्नांची आढावा बैठक घेण्यात येऊन शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या मार्गी लावण्यात आल्या, यावेळी आमदार श्री नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली आणि फुलंब्री तहसीलदार कानगुले साहेब, फुलंब्री पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती मोरे मॅडम, फुलंब्री तालुका कृषी अधिकारी भरत कासार यांच्या उपस्थितीत आढाव बैठक संपन्न झाली, याप्रसंगी भाजपा फुलंब्री तालुका अध्यक्ष सांडू आण्णा जाधव, माजी सभापती सर्जेराव पाटील मेटे, सरपंच वडोद बाजार गोपाळ वाघ, सुचित बोरसे, राजेंद्र डकले, अरूण गाडेकर, बाबुराव गव्हाड, भास्करराव पाटील कोलते, सुनिल पाटील कोलते, कयुम पठाण, गणेश गूरूवाड, ज्ञानेश्वर सांळुके, टाकळी कोलते सरपंच संजय पाटील काकडे, उपसरपंच विजय बाबुराव आहेर, चेअरमन दिलीपराव कोलते, शरदराव कोलते, आजिनाथ काकडे, सोमनाथ सांळुके, बालाजी शिंदे, हरीचंद्र गवनाजी कोलते, पदाधिकारी, शेतकरी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
Discussion about this post