• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर; दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी सादर केला होता प्रस्ताव

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अंबाजोगाई: शहराच्या नागरी पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या ७५ लाख १ हजार २७६ रुपयांच्या विविध विकासकामांना बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अधिकृत प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक प्रलंबित नागरी कामांचा मार्ग मोकळा झाला असून प्रभाग क्रमांक ४ आणि ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार नमिता मुंदडा आणि नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी या विकासकामांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेने सादर केलेल्या या प्रस्तावामुळे शहराच्या नियोजित विकास आराखड्यास गती मिळणार आहे.

या योजनेसाठी बीड जिल्ह्याकरिता एकूण ३५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी अंबाजोगाई नगरपरिषदेला लोकसंख्येच्या प्रमाणात ४ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, ज्यातील ७५ लाखांच्या पहिल्या टप्प्यातील कामांना ही मंजुरी मिळाली आहे. या मंजूर निधीतून अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील माळी नगर भागात गणेश राऊत ते उंबरकर आणि अर्जुन वाघमारे ते शिनगारे अशा विविध अंतरांवरील सीसी नाली व सीसी रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ४ मधील प्रशांत नगर भागात परशुराम मेहता ते बाळासाहेब इखे यांच्या घरापर्यंत सीसी रोड आणि नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे. नागरी सुविधांसोबतच प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी अंबाजोगाई नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीवर दुसऱ्या मजल्यावर नवीन हॉलचे बांधकामही या निधीतून प्रस्तावित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या सर्व कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, नगरपरिषद अंबाजोगाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शहरातील विकासकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा आणि नगराध्यक्ष श्री. नंदकिशोर मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

Ad 1
Previous Post

डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नांदेड च्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या तनूष शाम साहू यांनी सिल्व्हर मेडल पटकावलं

Next Post

उत्रादा गावात जलजिवन योजनेच्या कामात फार मोठा भ्रष्टाचार

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
उत्रादा गावात जलजिवन योजनेच्या कामात फार मोठा भ्रष्टाचार

उत्रादा गावात जलजिवन योजनेच्या कामात फार मोठा भ्रष्टाचार

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In