• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उत्रादा गावात जलजिवन योजनेच्या कामात फार मोठा भ्रष्टाचार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
उत्रादा गावात जलजिवन योजनेच्या कामात फार मोठा भ्रष्टाचार
0
SHARES
78
VIEWS
Ad 1
Ad 1

मौजे उत्रादा, तालुका चिखली येथील जलजिवन योजने अंतर्गत गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे व पाईपलाईनचे नित्कृष्ट कामाबाबतची चौकशी करण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरु

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

चिखली प्रतिनिधी

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे उत्रादा येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजना ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चिखली मार्फत उत्रादा गावाजवळ असलेल्या खोऱ्यातील धरणामध्ये उत्रादा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीचे बांधकाम हे अत्यंत कमी खोलीचे घेण्यात आलेले असून तेथून गावात येणारी पाईप लाईन चे खोदकाम तसेच पाईपाची जुळवणी यामध्ये तफावत असून थातुरमातुर जोडण्यात आलेली आहे.

तसेच ५० हजार लिटरची क्षमता असलेला १२ मी. उंच जलकुंभ सिमेंट काँक्रीटद्वारे बांधण्यात आलेली पाण्याची टाकी व त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टाकून तपासणी केली असता प्रथमतःच पाणी टाकल्यावर सदर पाण्याची टाकी ही झिरपु लागली व त्यातून पाण्याची गळती झाली. पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टाकल्यानंतरची गळती होत असतांना गावातील प्रतिष्ठीत व पत्रकार हजर होते. त्यांचे समक्ष पाणी गळती झाली यावरुन या पाण्याच्या टाकीचे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे यामध्ये वापरण्यात आलेली रेती, वाळू, गिट्टी, लोहा इत्यादी बांधकामासाठी लागणारे साहित्याची मात्रा ही कोटेशन मध्ये दिलेल्या अटी व नियमाप्रमाणे आहे किंवा कसे याची चाचणी होणे अत्यंत आवश्यक आहे. आज रोजी पाण्याची टाकी जर गळत असेल तर त्यामध्ये संपूर्ण पाणी भरल्यानंतर पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ती पाण्याची टाकी ढासळण्याची शक्यता नाकारता येत नसून त्याखाली उत्रादा गावातील महिलांचा व लोकांचा व लहान मुलांचा जिव जाण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडल्यास यास केवळ संबंधीत अधिकारी व ठेकेदार हेच जबाबदार राहतील.

या जलकुंभाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम तसेच विहीरीचे संपूर्ण खोलीकरणाचे काम याची क्वॉलीटी कंट्रोल बांधकाम मंडळ अकोला यांचे मार्फत वापरण्यात आलेल्या साहित्याची चौकशी करुन त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र घेवुन तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडण्यात यावे. तसेच प्रत्येक गावकऱ्याच्या घरासमोर पाईप लाईनचे कनेक्शन आणुन सोडलेले आहे ते काम अर्धवट सोडलेले आहे. तसेच पाईपलाईनच्या विहीरीपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या पाईपाच्या व्यासाची मि.मी. लांबी रुंदीची चौकशी करण्यात यावी. तरी सदरील निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित कामात दोषी आढळल्यास ठेकेदारास काळया यादीमध्ये टाकून त्याचे संपूर्ण बिल रोखण्यात यावे कारण बिल दिल्यावर ठेकेदार पळून गेल्यावर यदाकदाचीत पाण्याची टाकी पडल्यावर यास जबाबदार कोण? त्यासाठी तक्रारकर्त्याच्या नाहरकत प्रमाणपत्र घेवुन तेव्हाच बिल काढावे असे न झाल्यास उपरोक्त कामाची चौकशी न झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही न झाल्यास आम्ही आमरण उपोषण सुरूचं ठेवू. यामुळे आमच्या जीवितास धोका झाल्यास तसेच होणाऱ्या संपूर्ण परिणामाची जबाबदारी ठेकेदाराची व संबंधित अधिकाऱ्याची राहील याची शासनाने नोंद घ्यावी.

Ad 1
Previous Post

अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर; दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता

Next Post

मुलुंडमध्ये ‘कोकणी अवलिया’चा संगीत सोहळा; वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमासाठी निधी उभारणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
मुलुंडमध्ये ‘कोकणी अवलिया’चा संगीत सोहळा; वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमासाठी निधी उभारणी

मुलुंडमध्ये ‘कोकणी अवलिया’चा संगीत सोहळा; वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमासाठी निधी उभारणी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In