• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिवमध्ये बनावट डॉक्टरवर गुन्हा; रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
धाराशिवमध्ये बनावट डॉक्टरवर गुन्हा; रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप.
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

धाराशिव प्रतिनिधी दि ०९ जि. धाराशिव शहरात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका तथाकथित डॉक्टरविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. देवाशीष दास (बंगाली), रा. गणेशनगर, धाराशिव यांनी दि. 29 मार्च 2026 रोजी सुमारे दुपारी 3.25 वाजता देशपांडे स्टॅन्ड परिसरातील नेहरू चौक येथे कोणतीही वैध मान्यता नसताना वैद्यकीय व्यवसाय सुरू ठेवला होता. संबंधित आरोपीकडे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन (MCIM) ची कोणतीही मान्यता नसताना तो रुग्णांवर उपचार करत असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी डॉ. उन्मेश संतराम सेलुकर (वय 46), शासकीय वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय धाराशिव यांनी दि. 7 एप्रिल 2026 रोजी फिर्याद दिली. या फिर्यादीच्या आधारे धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 319(2), 279, 125 तसेच वैद्यकीय व्यवसाय अधिनियमातील कलम 33, 33(1), 33(2)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपीने बेकायदेशीररित्या वैद्यकीय व्यवसाय करून शासनाची तसेच सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक केली. इतकेच नव्हे तर, योग्य पात्रता नसताना उपचार केल्यामुळे रुग्णांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता.
या कारवाईनंतर शहरातील इतर बेकायदेशीर डॉक्टरांमध्ये घबराट पसरली असून, प्रशासनाने अशा बनावट डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
नागरिकांना आवाहन:
उपचार घेताना संबंधित डॉक्टरकडे वैध नोंदणी व परवाना आहे का, याची खात्री करूनच उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

शिवाजी पेठेत ‘माही’ यात्रेनिमित्त मटण वाटपासाठी पहाटेपासूनच गर्दी

Next Post

यशस्वी तरुणांचा अजमल अरबीक अँड इंग्लिश स्कूलमध्ये भव्य सत्कार

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
यशस्वी तरुणांचा अजमल अरबीक अँड इंग्लिश स्कूलमध्ये भव्य सत्कार

यशस्वी तरुणांचा अजमल अरबीक अँड इंग्लिश स्कूलमध्ये भव्य सत्कार

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In