• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धर्माच्या भिंती ओलांडून माणुसकीचे दर्शन: भाजी विक्रेता शारुक शाहने जपला सामाजिक सलोखा*

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
धर्माच्या भिंती ओलांडून माणुसकीचे दर्शन: भाजी विक्रेता शारुक शाहने जपला सामाजिक सलोखा*
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

सेलू.. तालुका प्रतिनिधी….
शंकर पानबुडे
नुकताच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना आणि ईदचा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सणाचे औचित्य साधत देशभरात सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासण्यासाठी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र, घोराड येथील एका सामान्य भाजी विक्रेत्याने दाखवलेली माणुसकीची कृती सध्या परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

घोराड (सेलू) येथील शारुक शाह या तरुणाने धर्मापलीकडे जात, केळझर येथील धम्मभूमीतील श्रामनेर विद्यार्थ्यांना शिरखुरमा आणि भोजन स्वखर्चातून दिले.
शारुक शाह हा तरुण बाजारात भाजी विकून आपला उदरनिर्वाह करतो. आपली कमाई मर्यादित असतानाही, त्याने समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचा संकल्प केला. केवळ सण साजरा न करता, तो आनंद इतर धर्मीय बांधवांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत वाटून घेण्याचा निर्णय त्याने घेतला.
केळझर येथील धम्मभूमीमध्ये श्रामनेर विद्यार्थ्यांना त्याने मोठ्या आपुलकीने शिरखुर्मा वितरित केला आणि सर्वांना भोजन दिले. आजच्या काळात जिथे धर्माच्या नावाने भिंती उभ्या केल्या जात आहेत, तिथे शारुक सारख्या सामान्य तरुणाने घेतलेला हा पुढाकार ‘माणुसकी हाच खरा धर्म’ असल्याचे सिद्ध करतो.

बॉक्स :
“आपण ज्या समाजात राहतो, तिथे सर्व धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे. माझ्या छोट्याशा प्रयत्नाने जर कुणाच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल आणि बंधुत्वाची भावना वाढत असेल, तर तेच माझे खरे भाग्य आहे.”
शारुक शाह
शारुकच्या या निस्वार्थ सेवेचे आणि दातृत्वाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, सोशल मीडियावरही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका भाजी विक्रेत्याने आपल्या कष्टाच्या पैशातून समाजाला दिलेला हा बंधुत्वाचा संदेश नक्कीच प्रेरणादायी आहे.

Ad 1
Tags: Shankar Panbude
Previous Post

शहादा बसस्थानकात शालेय विद्यार्थिनींमध्ये राडा; ‘दबंग’ महिलेची एन्ट्री अन् पोलिसांचा हस्तक्षेप.

Next Post

“जल, जंगल, जमीन, शिक्षण, न्याय, हक्क-अधिकार व संस्कृती रक्षणासाठी आदिवासी टायगर सेनेचा निर्धार”

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
“जल, जंगल, जमीन, शिक्षण, न्याय, हक्क-अधिकार व संस्कृती रक्षणासाठी आदिवासी टायगर सेनेचा निर्धार”

“जल, जंगल, जमीन, शिक्षण, न्याय, हक्क-अधिकार व संस्कृती रक्षणासाठी आदिवासी टायगर सेनेचा निर्धार”

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In