• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा बसस्थानकात शालेय विद्यार्थिनींमध्ये राडा; ‘दबंग’ महिलेची एन्ट्री अन् पोलिसांचा हस्तक्षेप.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा बसस्थानकात शालेय विद्यार्थिनींमध्ये राडा; ‘दबंग’ महिलेची एन्ट्री अन् पोलिसांचा हस्तक्षेप.
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

शहादा,दि.०९(प्रतिनिधी)
शहादा बसस्थानक परिसरात गुरुवार दि. ९ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेस विद्यार्थिनींच्या दोन गटांत जोरदार राडा झाल्याची घटना घडली. या वादात एका ‘दबंग’ महिलेने उडी घेत एका विद्यार्थिनीला मारहाण केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधितांना ताब्यात घेतले.

RelatedPosts

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

मिळालेल्या माहितीनुसार शहादा शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची दुपारी बसस्थानक परिसरात मोठी गर्दी होती. यावेळी कोणत्या तरी कारणावरून दोन विद्यार्थिनींमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर बघता बघता हाणामारीत झाले. तितक्यात एका महिलेने या वादात प्रवेश केला आणि तिचा ‘रुद्र अवतार’ पाहायला मिळाला. या महिलेने एका विद्यार्थिनीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार पाहून बसस्थानकातील प्रवासी थक्क झाले. वाद नेमका कशामुळे सुरू आहे, हे कोणालाही समजत नव्हते. त्या महिलेचा आक्रमक पवित्रा पाहून मध्यस्थी करण्यासाठी कोणीही पुढे येण्याचे धाडस दाखवत नव्हते. बसस्थानकातील हा गोंधळ पाहून एका सुज्ञ नागरिकाने तत्काळ पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस व्हॅन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाली. खाकी गणवेश दिसताच मारहाण करणाऱ्यांचा जोर ओसरला. पोलिसांनी तत्काळ संबंधितांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेले.पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलींच्या पालकांना व नातलगांना पाचारण केले. सामोपचाराने चर्चा घडवून आणत पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकला. मात्र, या सर्व भानगडीचे मूळ कारण काय होते, हे संध्याकाळपर्यंत समजू शकले नाही.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: सीसीटीव्ही सुरू आहेत का?-
शहादा बसस्थानकात शाळा-महाविद्यालये भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत हजारो विद्यार्थ्यांची गर्दी असते. अशा वेळी येथे कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच बसस्थानकात सुरक्षिततेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जर कॅमेरे सुरू असतील, तर या घटनेचे फुटेज तपासून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.
वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे बसस्थानक परिसर असुरक्षित बनत चालल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासन यावर काय ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

खरीप 2026 साठी तयारीला वेग : जळगावात युरियाचा पहिला रॅक दाखल

Next Post

धर्माच्या भिंती ओलांडून माणुसकीचे दर्शन: भाजी विक्रेता शारुक शाहने जपला सामाजिक सलोखा*

Related Posts

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

May 27, 2026
23
घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा
ताज्या घडामोडी

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

May 27, 2026
45
शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.
ताज्या घडामोडी

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

May 27, 2026
14
शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.
ताज्या घडामोडी

शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.

May 27, 2026
5
शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

May 27, 2026
15
कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू
ताज्या घडामोडी

कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू

May 27, 2026
8
Next Post
धर्माच्या भिंती ओलांडून माणुसकीचे दर्शन: भाजी विक्रेता शारुक शाहने जपला सामाजिक सलोखा*

धर्माच्या भिंती ओलांडून माणुसकीचे दर्शन: भाजी विक्रेता शारुक शाहने जपला सामाजिक सलोखा*

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

May 27, 2026
घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

May 27, 2026
शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

May 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In