• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जगाची बाजारपेठ मिळविण्यासाठी भारतीय तरूणांमध्ये हवे व्यवस्थापन कौशल्य : सर डॉ.नागेश जोंधळे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
जगाची बाजारपेठ मिळविण्यासाठी भारतीय तरूणांमध्ये हवे व्यवस्थापन कौशल्य : सर डॉ.नागेश जोंधळे
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

पदव्युत्तर कृषी महाविद्यालयात सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेस तरूणांचा उत्स्फूर्त सहभाग

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताला जागतिक बाजारपेठ मिळवून द्यायचे असेल तर उत्तम धान्य तसेच त्याचे सुयोग्य असे व्यवस्थापन केल्यास आपला देश हा आघाडीवर असेल यासाठी तरूणांमध्ये व्यवस्थापन कौशल्ये आवश्यक असल्याचे प्रतिपादन ॲमेझॉन बेस्ट सेलिंग पुस्तकाचे लेखक तथा विश्वविक्रमवीर सर डॉ.नागेश जोंधळे यांनी पदव्युत्तर कृषी महाविद्यालय, चाकूर येथे आयोजित सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्व विकास या एकदिवसीय कार्यशाळेत केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदव्युत्तर कृषी महाविद्यालय, चाकूरचे अधिष्ठाता डॉ.संतोष कांबळे, तर विशेष अतिथी म्हणून कृषी महाविद्यालय, लातूरचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रेरणादायी वक्ते तथा आई सेंटर प्रो चे संचालक सर डॉ.नागेश जोंधळे, मुख्य व्यवस्थापक संदीप अंबेसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सर डॉ.नागेश जोंधळे यांनी पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करताना कॉर्पोरेट वातावरणात सॉफ्ट स्किल्स चे महत्व,

संभाषण कौशल्य व आत्मविश्वास वाढीसाठी तसेच मुलाखत (इंटरव्ह्यू) मध्ये हमखास यश मिळविण्यासाठी प्रात्यक्षिक स्वरूपात सादरीकरण करीत तरूणांमध्ये अधिक आत्मविश्वास वाढविला. यावेळी डॉ.जोंधळे यांनी तरूणांमध्ये मूलभूत कॉर्पोरेट शिष्टाचार आणि व्यावसायिक वर्तन, बायोडेटा लेखन कौशल्ये यांचे आकर्षक असे पाॅवरपॉइंट प्रेझेंटेशन व व्हिडिओच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले व पुढील यशस्वी करिअर करण्यासाठी मंगल कामना व्यक्त केल्या. यावेळी विशेष अतिथी असलेले कृषी महाविद्यालय, लातूरचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी नेतृत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण, निर्णय क्षमता, टीम व्यवस्थापन व बदलत्या कृषी क्षेत्रातील संधी-आव्हाने याबाबत विचार मांडले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अधिष्ठाता डॉ.संतोष कांबळे यांनी सॉफ्ट स्किल्सचे महत्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना आधुनिक स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी सर डॉ.जोंधळे यांच्या या कार्यशाळेचा लाभ घेत आपले करिअर अधिक उंचीवर नेण्यासाठीचे आवाहन केले. कार्यशाळेच्या सुरूवातीला प्लेसमेंट सेलच्या प्रमुख डॉ.ज्योती झिरमिरे यांनी संस्थेची प्रोफाइल, प्लेसमेंट संधी व करिअर याचे विवरण उत्कृष्टपणे मांडत या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु.संस्कृती महाजन यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉ.अभिषेक राठोड यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

=====================

सोबत – बातमीचा फोटो.

Ad 1
Previous Post

“जल, जंगल, जमीन, शिक्षण, न्याय, हक्क-अधिकार व संस्कृती रक्षणासाठी आदिवासी टायगर सेनेचा निर्धार”

Next Post

इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही – जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही – जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण

इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही - जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In