• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही – जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही – जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत द्या ; आंदोलनाचा इशारा

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात अलीकडे करण्यात आलेल्या बदलांमध्ये इतिहास विषयातून चक्क मराठा साम्राज्याचा नकाशाच वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही असा परखड इशारा जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी दिला. शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी, बीड यांना निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी, बीड यांना गुरूवार, दिनांक 09 एप्रिल 2026 रोजी निवेदन देण्यात आले. सदरील निवेदन बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी स्वीकारले. सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठा साम्राज्य हा केवळ ऐतिहासिक विषय नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय अस्मितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार विद्यार्थ्यांना नकाशाच्या माध्यमातून स्पष्टपणे समजणे आवश्यक आहे. मात्र, काही इयत्तांमधून हा नकाशा वगळण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या आकलनावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता मराठा महासंघाने व्यक्त केली आहे. शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये क्यूआर कोड / ई-सामग्री आधारे नकाशाची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, या विषयावर तज्ज्ञ समिती स्थापन करून अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सदरील निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच, या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांच्या वतीने देण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष आदिनाथ पिंगळे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मराठा साम्राज्य हा केवळ ऐतिहासिक विषय नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक,

सामाजिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले स्वराज्य हे भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी आणि गौरवशाली पर्व आहे. या इतिहासाचे सुस्पष्ट आकलन विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी नकाशा हा अत्यंत महत्त्वाचा व प्रभावी घटक आहे. नकाशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठा साम्राज्याचा भौगोलिक विस्तार, राजकीय प्रभावक्षेत्र, तसेच ऐतिहासिक घडामोडी यांचे सखोल आणि दृश्यात्मक आकलन होते. नकाशा वगळल्यास विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असून, विषयाची सखोलता कमी होऊ शकते. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये दृश्यात्मक शिक्षणाला विशेष महत्त्व असल्याने, अशा घटकांचा समावेश आवश्यक आहे.‌ जरी अभ्यासक्रम सुलभीकरणाचा उद्देश लक्षात घेतला, तरी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटकांचे संक्षिप्तीकरण करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण ज्ञानावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे असे ही जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी सांगितले.

=======

Ad 1
Previous Post

जगाची बाजारपेठ मिळविण्यासाठी भारतीय तरूणांमध्ये हवे व्यवस्थापन कौशल्य : सर डॉ.नागेश जोंधळे

Next Post

देवगाव रंगारी येथे ‘महाराजस्व अभियान समाधान शिबीर’ उत्साहात; शेकडो नागरिकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
देवगाव रंगारी येथे ‘महाराजस्व अभियान समाधान शिबीर’ उत्साहात; शेकडो नागरिकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ

देवगाव रंगारी येथे 'महाराजस्व अभियान समाधान शिबीर' उत्साहात; शेकडो नागरिकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In