• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासवड येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवरांचा सन्मान; विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
सासवड येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवरांचा सन्मान; विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर
0
SHARES
65
VIEWS
Ad 1
Ad 1

पुरंदर : प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने हा सोहळा मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पार पडणार आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या संयुक्त जयंती सोहळ्यात गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांसह विविध महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव एकत्र साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सामाजिक, प्रशासकीय, पोलीस, बँकिंग व उद्योग क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये माहूर येथील आदर्श शिक्षक आनंदराव घोरपडे यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार”, काळदरी येथील माजी तहसीलदार सी. एम. यादव यांना “आदर्श प्रशासकीय सेवा पुरस्कार”, हरगुडे येथील शैलेश धिवार यांना “आदर्श पोलीस अधिकारी पुरस्कार”, पिंपळे येथील विजय कांबळे यांना “आदर्श बँक अधिकारी पुरस्कार” जाहीर करण्यात आले आहेत. तसेच सुपे खुर्द येथील उद्योजक अविनाश जगताप, सोनोरी येथील भाऊसाहेब सोनवणे आणि सिंगापूर येथील आबासाहेब वाघमारे यांना “उद्योगरत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास पुरंदर-हवेली मतदारसंघातील आजी-माजी आमदार, सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जयंती महोत्सव समितीचे विश्वस्त अॅड. सुनिलतात्या धिवार भूषविणार असून स्वागताध्यक्षपदी नगरसेवक सोपान रणपिसे असणार आहेत.

“चलो बुद्धं की ओर” या संकल्पनेवर आधारित प्रबोधनपर व्याख्यानासाठी धम्मप्रचारक प्रबुद्ध साठे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णूदादा भोसले करणार असून सूत्रसंचालन कैलास धिवार, सुनिल जगताप व डॉ. विनायक गायकवाड करणार आहेत. धार्मिक विधी भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून आभार प्रदर्शन शशीभाऊ गायकवाड, राहुल गायकवाड, अनिल कांबळे व अशोक गायकवाड करणार आहेत.

कार्यक्रम तीन सत्रांमध्ये पार पडणार असून सकाळी १० वाजता महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण व ध्वजारोहण, सकाळी ११ ते १ प्रबोधन सभा, दुपारी १ ते २ भोजन, तर दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत चेतना आर्ट्स प्रस्तुत चंद्रकांत चव्हाण यांच्या भीमगीतांच्या जल्लोषमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य सोहळ्यास शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेवर कार्य करणाऱ्या सर्व नागरिकांनी, भिमसैनिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महोत्सव समितीचे विश्वस्त बळीराम सोनवणे, अमोल जगताप, सुधीर शेलार, योगेश घोरपडे, कालीदास उबाळे, सचिन कांबळे, स्वप्नील पाटोळे, सुहास बेंगाळे, अतुल भोसले व श्रीधर गायकवाड यांनी केले आहे.

Ad 1
Tags: Vinayak Gaikwad
Previous Post

नागापूर गाव सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत .वान नदीचे खोलीकरण व रस्ते,विविध मागण्याचे निवेदन. परळी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

Next Post

पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग

पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In