• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवैध खनिज उत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई; मारेगाव तालुक्याला जिल्ह्यात प्रथम क्रमांक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

मारेगाव : प्रतिनिधी

मारेगाव तालुक्यातील खनिज संपत्तीच्या अवैध उत्खननावर महसूल विभागाने कठोर पावले उचलत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली असून, या प्रभावी मोहिमेमुळे महसूल वसुलीत मारेगाव तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती समोर आली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मारेगाव तालुक्यात एकूण चार सर्कल असून या परिसरात नैसर्गिकरित्या खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, काही ठिकाणी या संपत्तीचे अवैध उत्खनन होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने आपली यंत्रणा अधिक सक्षम करत व्यापक कारवाई सुरू केली.

मारेगाव शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर खनिज उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. महसूल विभागाच्या नोंदीनुसार या भागात एकूण १३ खदानी नोंदविलेल्या असून त्यापैकी केवळ ९ खदानी अधिकृतपणे कार्यरत असल्याचे आढळले. काही ठिकाणी शासनाने दिलेल्या लीज अटींचे उल्लंघन करत अतिरिक्त उत्खनन केल्याचेही मोजमापादरम्यान स्पष्ट झाले.

या अनियमिततेची वर्षअखेरीस पडताळणी करण्यात आल्यानंतर तहसीलदार उत्तम निलावाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर उच्च अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार एचडीपीओ आणि अतिरिक्त अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

या आदेशानुसार तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील थकित महसूल वसुली मोहिम राबवण्यात आली. नियमभंग करणाऱ्या खदानींवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात महसूल वसूल करण्यात आला. परिणामी, महसूल विभागाची कार्यक्षमता वाढली असून सरकारी खात्याचा महसूल वाढवण्यात यश आले आहे.

या प्रभावी कामगिरीमुळे मारेगाव महसूल विभागाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती मिळाली असून, या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Ad 1
Tags: Pranay Khaire
Previous Post

एसी हॉलच्या मागणीवरून तुटले लग्न; वरपक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

रांजणगाव एमआयडीसीमध्ये कामगारांचा तुटवडा; उद्योग क्षेत्र चिंतेत

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

रांजणगाव एमआयडीसीमध्ये कामगारांचा तुटवडा; उद्योग क्षेत्र चिंतेत

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In