बिग बॉसच्या घरात कालचा भाग भावनांनी ओथंबलेला होता, कारण स्पर्धक DP धनंजय पोवार यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली. त्यांच्या वडिलांची, आईची आणि पत्नीची घरात येणं, हा क्षण अक्षरशः सगळ्यांचं मन हेलावून गेला. 💖
धनंजयचे वडील घरात आले आणि त्यांनी प्रवेश करताच, DP धनंजय वडिलांच्या पाया पडून त्यांच्या पायाजवळ बसला. वडिलांच्या डोळ्यांत अभिमानाचा भाव होता 👏, आणि त्यांचे शब्द म्हणजे धनंजयसाठी आशीर्वादासारखे होते. या आशीर्वादांनी धनंजयच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले 😢, आणि तो भावनांच्या लाटेत पूर्णपणे वाहून गेला.
यानंतर, त्यांची आई आणि पत्नी घरात आली, आणि हा धनंजयसाठी खूपच भावुक क्षण ठरला. आईला पाहून धनंजयच्या चेहऱ्यावर आनंदाचा झरा फुलला 😄, आणि पत्नीने घरात पाऊल टाकताच त्याच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक झाल्याने 🙏, घरातलं वातावरण एकदम शांत आणि भावूक झालं. इतर सदस्यही या दृश्याने अंतर्मुख झाले. 💫💓
हा प्रसंग जितका सुंदर होता तितकाच हृदयाला भिडणारा, आणि प्रेक्षकांच्या मनावर त्याचा गहिरा परिणाम झाला. कुटुंबाची ही भेट फक्त धनंजयसाठीच नव्हे, तर घरातील इतरांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही कायम लक्षात राहील, आणि त्यांना त्यांच्या माणसांची आठवण करून देत राहील.
Discussion about this post