• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनगीर येथे मध्यवर्ती बसस्थानकाची मागणी.मध्यवर्ती बसस्थानक कृती समितीच्या वतीने निवेदन सादर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

सोनगीर दि. 11 (प्रतिनिधी)
धुळे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या सोनगीर येथे गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या मागणीसाठी आता ग्रामस्थ आणि तरुण आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात शनिवारी ‘मध्यवर्ती बस स्थानक कृती समिती’च्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
सुमारे 35 हजार लोकसंख्या असलेल्या सोनगीर गावाला शिरपूर, धुळे आणि दोंडाईचा या तिन्ही दिशांना जाण्यासाठी सध्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी बस थांबे आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे तिन्ही थांबे एकत्रित करून एका मध्यवर्ती बस स्थानकाची निर्मिती व्हावी, अशी मागणी गेल्या पाच दशकांपासून केली जात आहे.बस स्थानकासाठी पोलीस ठाण्यासमोर गट नंबर 65 मध्ये सुमारे चार एकर जागा ग्रामपंचायत स्तरावर आरक्षित आहे. मात्र, सध्या या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण रोखण्यासाठी आणि जागेचा ताबा महामंडळाकडे मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी आता ‘आरपार’ची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.
शिष्टमंडळाशी चर्चा करताना विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी स्पष्ट कि, वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिल्यास या जागेवर तात्काळ दहा बाय चाळीस फूट आकाराचे पिकअप शेड उभारणे शक्य आहे.तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महसूल विभागाकडून ही जागा महामंडळाच्या ताब्यात घेण्यासाठी जलद गतीने प्रयत्न केले जातील.
लोकप्रतिनिधींच्या निधीतून या जागेचा विकास करण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
या मागणीसाठी गावातील तरुणांनी एकत्र येत सर्वपक्षीय कृती समिती स्थापन केली आहे. या समितीने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या जागेचा विकास करण्यासाठी गावकरी सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. याप्रसंगी कृती समितीचे निमंत्रक मुरलीधर मोरे, प्रमोद धनगर, अमित बागुल, रविराज माळी, संदीप गुजर, किशोर पावनकर, जितेंद्र बागुल, दिनेश देवरे, निखिलसिंग परदेशी, संदीप पाटील, हसन खा पठाण, अनिल पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

Ad 1
Previous Post

भिम जयंती-समता पर्व २०२६!! रामपुरा (कोकर्डा )

Next Post

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकरणात बनावट सह्या व फसवणुकीचा आरोप; सखोल चौकशीची मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकरणात बनावट सह्या व फसवणुकीचा आरोप; सखोल चौकशीची मागणी

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकरणात बनावट सह्या व फसवणुकीचा आरोप; सखोल चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In