• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा हायस्कूलच्या वेदिका पोतदारची ‘इस्त्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा हायस्कूलच्या वेदिका पोतदारची ‘इस्त्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘युवक वैज्ञानिक कार्यक्रम’ (युविका) अंतर्गत देशपातळीवरील निवड प्रक्रियेत आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदिका विजय पोतदार हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची तामिळनाडू येथील Mahendragiri Aerospace Centre येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून, तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ‘युविका’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जातो. यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी अर्ज करतात. यावर्षी अत्यंत कठीण निवड प्रक्रियेनंतर केवळ ४५६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये वेदिका पोतदार हिने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर स्थान मिळवून शाळा आणि तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

१० ते २२ मे दरम्यान अभ्यास दौरा
हा अभ्यास दौरा १० मे ते २२ मे दरम्यान पार पडणार असून, या कालावधीत विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, रॉकेट तंत्रज्ञान आणि उपग्रह प्रक्षेपणाबाबत प्रत्यक्ष शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव
वेदिकाच्या या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी, संचालक मंडळ, सल्लागार समिती तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर, उपमुख्याध्यापिका सौ. एच. एस. कामत, पर्यवेक्षक श्री. ए. आर. व्हस्कोटी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने थेट अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत भरारी घेतल्याने परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही ही प्रेरणादायी बाब ठरली आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

स्मार्ट मीटर बसले, पण वीज झाली ‘अनस्मार्ट’?; रिसोडमध्ये नागरिक त्रस्त

Next Post

‘शक्तीपीठ’ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात एल्गार; प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा सुरूच – राजू शेट्टी

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
‘शक्तीपीठ’ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात एल्गार; प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा सुरूच – राजू शेट्टी

‘शक्तीपीठ’ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात एल्गार; प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा सुरूच – राजू शेट्टी

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In