• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तडीपार तरुणाकडून नशेच्या गोळ्या जप्त; पोलिसांची कारवाई, एक अटकेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

कन्नड प्रतिनिधी

कन्नड शहरात तडीपार असलेल्या एका तरुणाकडून अवैधरित्या नशेच्या गोळ्या जप्त करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या कारवाईत मोबाईल, दुचाकीसह एकूण ७५ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक रंगनाथ सानप यांना संबंधित इसमावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सानप, हेड कॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, पोलीस अमलदार विजय चौधरी, ग्रामविकास अधिकारी नितेश वेद आणि औषध निरीक्षक मनोज पैठण यांच्या पथकाने रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकासमोरील खांडसरी परिसरात सापळा रचला.

यावेळी आंब्याच्या झाडाजवळ मोटारसायकलसह संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या इसमाची चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव निखिल मधुकर सुरे, रा. नवजीवन कॉलनी, साने गुरुजी शाळेजवळ असे सांगितले.

तहसीलदार सारिका भगत, दोन पंच आणि औषध निरीक्षक यांच्या उपस्थितीत त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात नशेच्या गोळ्या आढळून आल्या. तसेच एक मोबाईल आणि सुझुकी कंपनीची दुचाकी असा एकूण ७५ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी पोलीस अमलदार विजय चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ सानप हे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

विशेष म्हणजे, संबंधित आरोपी हा तडीपार होता आणि त्याच्या तडीपारीची मुदत संपण्यास अवघे १५ दिवस बाकी असतानाच तो पुन्हा अवैध कृत्यात आढळून आला.

Tags: Rayabhan Shravan Salve
Previous Post

“लंगोटी महादेव” मंदिराचा होणार कायाकल्प

Next Post

शैलेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; नगरपरिषदेकडून गतिरोधक सुरक्षित

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
शैलेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; नगरपरिषदेकडून गतिरोधक सुरक्षित

शैलेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; नगरपरिषदेकडून गतिरोधक सुरक्षित

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In