• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शैलेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; नगरपरिषदेकडून गतिरोधक सुरक्षित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
शैलेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; नगरपरिषदेकडून गतिरोधक सुरक्षित
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

शिरुर (प्रतिनिधी) – शिरुर शहरातील हुडको कॉलनी परिसरातील धोकादायक ठरत असलेल्या गतिरोधकांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर अखेर शिरुर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली असून रविवारी (दि. १७ मे २०२६) संबंधित गतिरोधकांवर पांढरे परावर्तित पट्टे मारण्याचे काम करण्यात आले.

हुडको कॉलनीतील सनराईज कटिंग दुकानाजवळ, सुखकर्ता किराणा दुकानाजवळ आणि आदित्य सुपर मार्केटजवळ बसविण्यात आलेल्या तीन गतिरोधकांवर कोणतेही परावर्तित रंगकाम अथवा सूचना फलक नसल्याने परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना गतिरोधक न दिसल्याने अचानक ब्रेक लावावे लागत होते.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने शिरुर नगरपरिषदेकडे लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली होती. तसेच २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आदित्य सुपर मार्केटजवळ गतिरोधकामुळे झालेल्या किरकोळ अपघाताचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला होता.

निवेदनात गतिरोधकांवर परावर्तित रंगकाम करणे, सूचना फलक लावणे, गतिरोधकांचे मापदंड तपासणे तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेत नगरपरिषदेकडून संबंधित गतिरोधकांवर पांढरे परावर्तित पट्टे मारण्यात आले. याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव म्हणाले, “उशिरा का होईना, पण प्रशासनाला जाग आली आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काम पूर्ण करण्यात आले, याबद्दल प्रशासनाचे आभार.”

स्थानिक नागरिकांनीही या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत पुढील काळात शहरातील सर्व गतिरोधकांवर नियमांनुसार सूचना फलक व आवश्यक सुरक्षितता उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Tags: Shailesh Jadhav
Previous Post

तडीपार तरुणाकडून नशेच्या गोळ्या जप्त; पोलिसांची कारवाई, एक अटकेत

Next Post

सिंदखेडराजा तालुक्यात खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उपसा; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
सिंदखेडराजा तालुक्यात खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उपसा; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सिंदखेडराजा तालुक्यात खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उपसा; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In