• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनसाखळी चोरणारे दोन चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांची संयुक्त कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
सोनसाखळी चोरणारे दोन चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांची संयुक्त कारवाई
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

आष्टी | प्रतिनिधी | दि. 25 मे

दुचाकीवरून येत नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले आहे.

RelatedPosts

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी आष्टी परिसरात एक व्यक्ती पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करत 25 पेक्षा अधिक गुन्हेगार वस्त्यांची पडताळणी, हिस्ट्रीशीटरांची चौकशी तसेच 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विकास गडया भोसले (वय 22, रा. चिखली, ता. आष्टी) याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने आपल्या साथीदार अरुण बष्णा काळे (वय 23, रा. बोलेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींनी बीड जिल्ह्यातील किमान तीन सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची प्राथमिक कबुली दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, तसेच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

शहाद्यात राष्ट्रीय जनगणनेचा दुसरा टप्पा संथ गतीने; अनेक प्रभागांत अद्याप प्रगणक फिरकलेच नाहीत

Next Post

आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; किन्ही परिसरात पिकांचे मोठे नुकसान, जनजीवन विस्कळीत

Related Posts

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
0
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
6
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
2
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
0
ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

July 12, 2026
47
ताज्या घडामोडी

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

July 12, 2026
9
Next Post

आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; किन्ही परिसरात पिकांचे मोठे नुकसान, जनजीवन विस्कळीत

ताज्या बातम्या

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
स्व. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त किणी (य) येथे मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर; ८० रुग्णांची तपासणी

स्व. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त किणी (य) येथे मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर; ८० रुग्णांची तपासणी

July 12, 2026

जि.प. केंद्रीय कन्या शाळा, अमळनेर (भां.) येथे श्री. वारे सर यांची केंद्रप्रमुखपदी नियुक्ती; शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In