• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकवर्गणीतून उभारलेल्या “ज्ञानांकुर अभ्यासिकेचे” सीईओ डॉ. कृष्णकांत कनवरिया यांच्या हस्ते उद्घाटन

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोकवर्गणीतून उभारलेल्या “ज्ञानांकुर अभ्यासिकेचे” सीईओ डॉ. कृष्णकांत कनवरिया यांच्या हस्ते उद्घाटन
0
SHARES
55
VIEWS
Ad 1
Ad 1

मौजे बाजार वायगाव / प्रतिनिधी

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मौजे बाजार वायगाव येथे दिनांक २६ मे २०२६ रोजी लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या “ज्ञानांकुर अभ्यासिकेचे” उद्घाटन जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. कृष्णकांत कनवरिया (IAS) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले.

साहेबांच्या आगमनावेळी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यानंतर मा. डॉ. कनवरिया यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर अभ्यासिकेच्या दालनाचे रिबीन कापून विधिवत उद्घाटन करण्यात आले.

यानंतर मुख्य कार्यक्रम भव्य विचारमंचावर पार पडला. यावेळी डॉ. कृष्णकांत कनवरिया यांनी गावातील अभ्यासिका समिती, विद्यार्थ्यांचे प्रयत्न आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी आपल्या जीवनप्रवासाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला तसेच पालकांशीही चर्चा केली.

विशेष म्हणजे “अभ्यासिका” हा त्यांच्या मनातील पायलट प्रोजेक्ट असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील नागरिकांनी लोकवर्गणीतून ही अभ्यासिका उभारल्याबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना सातत्याने अभ्यास करण्यासाठी प्रेरित करत अभ्यासिका अधिक प्रभावी आणि यशस्वीपणे चालविण्यासाठी आवश्यक सूचना देखील त्यांनी दिल्या.

कार्यक्रमादरम्यान अभ्यासिकेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभ्यासिका समिती, गावातील भूमिपुत्र शिक्षक तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Ad 1
Previous Post

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; रेल्वे स्टेशनवरील वडापाव आणि समोसा महागला

Next Post

मोजणी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप; चौकशी करून कठोर कारवाईची मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
मोजणी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप; चौकशी करून कठोर कारवाईची मागणी

मोजणी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप; चौकशी करून कठोर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In