• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“पाचकंदील चौकातील सिमेंट रस्ता की ‘वाट’…? शिरूर शहरात रंगली जोरदार चर्चा

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
“पाचकंदील चौकातील सिमेंट रस्ता की ‘वाट’…? शिरूर शहरात रंगली जोरदार चर्चा
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

“पाचकंदील चौकातील सिमेंट रस्ता की ‘वाट’…? शिरूर शहरात रंगली जोरदार चर्चा…” ; “कोट्यवधींचा रस्ता की निकृष्ट कामाचा नमुना? नागरिकांकडून चौकशीची मागणी…”

“ठेकेदारासाठी रस्ता की कार्यकर्त्यांसाठी सोय…? पाचकंदील चौकातील कामावर नागरिकांचे प्रश्न”

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

शिरूर, शिरूर शहरातील पाचकंदील चौक परिसरात करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची सध्या शहरभर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. नागरिकांमधून या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत, रुंदीबाबत तसेच प्रत्यक्ष काम आणि अंदाजपत्रक यामध्ये तफावत असल्याची चर्चा उघडपणे होताना दिसत आहे.

स्थानिक नागरिकांमधून “हा खरंच सिमेंट रस्ता आहे की फक्त वाटेसारखा मार्ग तयार करण्यात आला आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरातील अनेक जण या कामाबाबत नाराजी व्यक्त करत असून, कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमध्ये प्रत्यक्ष दर्जेदार काम झाले का, याची चौकशी व्हावी अशी मागणी पुढे येत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्याचे काम करताना वापरण्यात आलेल्या सिमेंटची जाडी किती एमएमची आहे, काम करताना तांत्रिक नियमांचे पालन झाले का, तसेच इस्टिमेटनुसारच काम झाले आहे का, याबाबत प्रशासनाने खुलासा करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बनवला की फक्त काही जवळच्या लोकांना पोहोचण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला, अशीही चर्चा शहरात रंगताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, शहरातील नागरिकांमध्ये “विकासकामे फक्त कागदावर झाली की प्रत्यक्षातही दर्जेदार झाली?” असा प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित विभागाने कामाचे संपूर्ण अंदाजपत्रक, मोजमाप आणि गुणवत्ता अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिमेंट रस्त्यांची गुणवत्ता अधिक महत्त्वाची मानली जाते. मात्र पाचकंदील चौकातील या कामामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कामाची तांत्रिक चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Ad 1
Tags: Avinash Ghogare
Previous Post

जामनेर शहरात मध्यवर्ती भागात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! उष्माघात की घातपात

Next Post

वार्ड क्रमांक 8 मध्ये पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचले; नागरिक त्रस्त, नगर पंचायत मात्र झोपेत?

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
वार्ड क्रमांक 8 मध्ये पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचले; नागरिक त्रस्त, नगर पंचायत मात्र झोपेत?

वार्ड क्रमांक 8 मध्ये पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचले; नागरिक त्रस्त, नगर पंचायत मात्र झोपेत?

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In