• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फलटणसाठी मोठी घोषणा अतिरिक्त एमआयडीसीला हिरवा कंदील; बूथ अध्यक्षांना शिवसेनेची पूर्ण ताकद – उदय सामंत

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
फलटणसाठी मोठी घोषणा अतिरिक्त एमआयडीसीला हिरवा कंदील; बूथ अध्यक्षांना शिवसेनेची पूर्ण ताकद – उदय सामंत
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

फलटणसाठी मोठी घोषणा अतिरिक्त एमआयडीसीला हिरवा कंदील; बूथ अध्यक्षांना शिवसेनेची पूर्ण ताकद – उदय सामंत

प्रतिनिधी निकेश भिसे
दि. 27 जून 2026
फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटणसाठी मोठी आणि महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून, फलटणमध्ये अतिरिक्त एमआयडीसी उभारण्याच्या मागणीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

फलटण येथे आयोजित २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी निवड आढावा, BL-2 नोंदणी अभियान तसेच फलटण नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष, असे सांगत उदय सामंत यांनी फलटणमध्ये अतिरिक्त एमआयडीसी उभारण्याचे काम निश्चित पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या घोषणेमुळे फलटण परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.

यावेळी त्यांनी फलटणमध्ये कार्यरत असलेल्या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या पोटॅशियम उत्पादक कंपनीचाही उल्लेख केला. राज्य सरकार या कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करणार असून, भविष्यात राज्यातील इतर एमआयडीसी क्षेत्रात विस्तारासाठी जागा आवश्यक असल्यास ती प्राधान्याने उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात बोलताना उदय सामंत यांनी शिवसेना संघटनेच्या ताकदीवर विशेष भर दिला.
शिवसेनेचे पदाधिकारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनाही हक्काने आदेश देऊ शकतात.असे सांगत त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.

शिवसेना जिल्हाध्यक्षांनी आमदार किंवा मंत्र्यांच्या गाडीचे दरवाजे उघडण्याचे काम करू नये. धर्मवीर आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दरारा निर्माण करा. असे आवाहनही त्यांनी केले.

पक्ष संघटनेतील बूथ अध्यक्षांबाबत मोठी घोषणा करताना उदय सामंत म्हणाले, बूथ अध्यक्षाला शिवसेनेची पूर्ण ताकद आणि संरक्षण दिले जाईल. असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भाषणादरम्यान उदय सामंत यांनी
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीदेखील शिवसेनेच्या शाखा रचनेतून प्रेरणा घेत पक्षविस्तार केल्याचा उल्लेख केला.

दरम्यान कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना आमदार करा अशा जोरदार घोषणा दिल्याने सभा दणाणून गेले. त्यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, जे माझ्या हातात नाही त्याची जबाबदारी मी घेणार नाही. मात्र कार्यकर्त्यांची भावना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी आणि माजी खासदार राहुल शेवाळे स्वीकारत आहोत.

या वक्तव्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, राहुल शेवाळे, चंद्रहार पाटील आणि उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि फलटण नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Ad 1
Tags: Nikesh Bhise
Previous Post

एरंडोली गावात कुकडी कालवा फोडून पाईपद्वारे पाण्याची चोरी !

Next Post

देविदास गाडे यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक सत्कार

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
देविदास गाडे यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक सत्कार

देविदास गाडे यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक सत्कार

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In