• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वडमाळवाडी शाळेत पाण्याच्या टाकीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
वडमाळवाडी शाळेत पाण्याच्या टाकीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

खारपाडा, पेण / पत्रकार कैलासराजे घरत

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र, आपटा फाटा संचालक ओमप्रकाश परांजपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महिला परिषद – दादर माटुंगा शाखा आणि युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील रा. जि. प. शाळा वडमाळवाडी येथे पाण्याच्या टाकीचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

“जॉय फुल गिव्हर्स” या सेवाभावी उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई ब्रँच पेट्रन रेखा साळी मॅडम, दादर माटुंगा शाखेच्या अध्यक्षा डॉली अय्यम, उपाध्यक्षा श्यामल कुर्डुकर तसेच माजी विश्वस्त सुलक्षणा निमगावकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी रेखा साळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर डॉली अय्यम यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.

यानंतर अध्यक्षा डॉली अय्यम यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे पूजन करून टाकी सुरू करण्यात आली. हळद-कुंकू, अक्षता, निरंजन आणि अगरबत्तीने पूजन करत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

वडमाळवाडी शाळेत आदिवासी समाजातील गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असून पिण्याच्या पाण्याच्या टाकीअभावी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र भूषण पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते कैलासराजे घरत यांनी पाठपुरावा करत अखिल भारतीय महिला परिषद व युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन यांच्या माध्यमातून पाण्याची टाकी, पाइपलाइन कनेक्शन आणि मोटार पंप व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र भोईर यांनी संस्थांचे आभार व्यक्त करत पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत यांनी केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नरेंद्र भोईर यांनी स्वागत गीतासह केले. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी माजी अध्यक्षा ललिता काशीकर, सहसंचालिका नेहा वेंगुर्लेकर, शारदा शिलवंत, पुष्पा भोसले, राजश्री सारदळ, योगिता निमकर, मीना अशोक जाधव, सामाजिक कार्यकर्ते मितेश पाटील, रोहिणी ठाकूर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका सौ. शालिनी नरेंद्र भोईर, स्कूल कमिटी अध्यक्षा अश्विनी रवींद्र वाघे, चंद्रभागा काशिनाथ पवार, नर्मदा वाघे तसेच महिला वर्ग, पालक वर्ग आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापक नरेंद्र भोईर यांनी केले होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Ad 1
Tags: Kailas Gharat
Previous Post

श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीसंदर्भातील बातमी पुढीलप्रमाणे:

Next Post

सुशांत भैय्या मोहिते यांची देवा ग्रुप फाऊंडेशन सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
सुशांत भैय्या मोहिते यांची देवा ग्रुप फाऊंडेशन सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड

सुशांत भैय्या मोहिते यांची देवा ग्रुप फाऊंडेशन सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ

मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ

October 11, 2026
मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In