• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती सोहळ्याचे शासकीय आयोजन

Rudra by Rudra
May 30, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती सोहळ्याचे शासकीय आयोजन; १२०० कोटींचा विकास आराखडा तयार..

चौकटः ३१ मे रोजी मुख्य शासकीय पूजा
जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे
३१ मे रोजी पहाटे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्येश्वर मंदिरात महाअभिषेक, यथासांग पूजा व धार्मिक विधी पार पडणार आहेत.

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचे कवी संमेलन, भव्य ड्रोन शो अन् फटाक्यांची आतिषबाजी; स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र चोंडी येथे राज्यस्तरीय भव्य आणि नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या वतीने हा जयंती सोहळा पूर्ण शासकीय इतमामात साजरा केला जाणार असल्याची माहिती विधान परिषदेचे अध्यक्ष तथा जयंती उत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, गेल्या वर्षी ६ मे २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत चोंडी विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली होती.

चोंडीसाठी १२०० कोटीपेक्षा अधिक निधी

चोंडीच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३६० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, आणखी ६८१ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय जलसंधारण विभागाचेही प्रस्ताव शासनाकडे दाखल आहेत. एकूणच १२०० कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होऊ शकली नसली तरी शासनस्तरावरील सर्व तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल

यंदाचा जयंती सोहळा दोन दिवसांचा असून, विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांनी तो सजणार आहे.

आकर्षक रोषणाईः आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून चोंडी परिसरात आकर्षक रोषणाई व दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे.

कवी संमेलनः ३० मे रोजी रात्री ७.३० ते १० या वेळेत देशातील प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

भव्य ड्रोन शोः रात्री ११ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित भव्य ‘ड्रोन शो’ सादर करण्यात येणार असून, आकाशातून त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास नागरिकांना अनुभवता येईल.

फटाक्यांची आतिषबाजीः रात्री १२ वाजता आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.

दिग्गजांची मांदियाळी
या भव्य जयंती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री दत्तामामा भरणे, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, धनगर समाजातील माजी आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा ऐतिहासिक आणि नेत्रदीपक जयंती सोहळा अनुभवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती तथा स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.

Ad 1
Previous Post

लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

जामखेड तालुक्यातील दिंडीचे (बावी ) नगरीत जल्लोषात स्वागत…

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
10
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
8
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
17
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
11
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
18
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
4
Next Post

जामखेड तालुक्यातील दिंडीचे (बावी ) नगरीत जल्लोषात स्वागत…

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In