• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाकी नदीकाठावर अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 45 हजारांचा मुद्देमाल जप्त.

Rudra by Rudra
June 1, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

वाकी नदीकाठावर अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 45 हजारांचा मुद्देमाल जप्त.

शहादा,दि.31(का.प्र.)
म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. फत्तेपूर गावाजवळील वाकी नदीच्या किनारी झाडीझुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.30 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास फत्तेपूर (ता. शहादा) गावाजवळील वाकी नदीच्या किनारी काटेरी झाडे व झुडपांच्या आडोशाला अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांना मिळाली होती. माहिती मिळताच स.पो.नि. वावरे यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि अचानक छापा टाकला.या छाप्यात पोलिसांनी विकास सत्या ठाकरे (वय 27, रा. फत्तेपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार) या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून दारू निर्मितीसाठी

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

वापरण्यात येणारे साहित्य आणि तयार हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.कारवाईत 10 लोखंडी ड्रम 8 मोटारींच्या ट्यूबमध्ये भरलेली सुमारे 400 लिटर गावठी दारू,दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे १० प्लास्टिकचे पाईप असा एकूण अंदाजे किंमत 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस शिपाई मुकेश ओंकारसिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात संशयित विकास ठाकरे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास सपोनि विठ्ठल पावरा हे करीत आहेत.म्हसावद पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर यापुढेही सातत्याने कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Ad 1
Previous Post

विना शस्त्रक्रिया नाकावाटे काढली मेंदूतील गुंतागुंतीची गाठ

Next Post

चोरीची मोटारसायकल जप्त, आरोपी जेरबंद.

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
11
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
2
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
1
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
2
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
23
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post

चोरीची मोटारसायकल जप्त, आरोपी जेरबंद.

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In