• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चोरीची मोटारसायकल जप्त, आरोपी जेरबंद.

Rudra by Rudra
June 1, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.31(का.प्र.)
शहादा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. शहादा बसस्टँड परिसरामधून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत शोधून काढत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाहनचोरांचे धाबे दणाणले असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.दि.25 मे रोजी सायंकाळी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. श्रीराम ट्रान्सपोर्टजवळील लोणखेडा बायपास रोड परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या लाल रंगाची बजाज प्लॅटिना मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची ती माहिती होती.माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकाला सतर्क केले. पथकातील पोलीस अंमलदार दिपक चौधरी, भगवान सावळे आणि कपिल मंडील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित इसमाला ताब्यात घेतले.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संशयिताने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. अधिक कसून चौकशी केली असता त्याचे नाव धनराज पवार (वय २०, रा. मिरानगर, पाडळदा रोड, शहादा) असल्याचे समोर आले.संशयिताकडील मोटारसायकलची आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता, वाहनावर लावलेला नंबर बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी हुशारीने गाडीचा चेसिस क्रमांक तपासून माहिती काढली. तेव्हा सदर मोटारसायकल ही भुषण संतोष पाटील (रा. विखरण, ता. शिरपूर, जि. धुळे) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. ही मोटारसायकल 19 मे रोजी शहादा येथील लड्डू चहावाला बसस्टँड परिसरातून चोरीला गेली होती. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान आरोपी धनराज पवार याने ती मोटारसायकल आपणच चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 50 हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल जप्त केली आहे. तपासात या वाहनाचा मूळ क्रमांक एमएच18बीडब्ल्यू1243 असल्याचे स्पष्ट झाले आहे.आरोपीला अटक करण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिपक चौधरी करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली.वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी शहादा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, नागरिकांना आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

वाकी नदीकाठावर अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 45 हजारांचा मुद्देमाल जप्त.

Next Post

मराठा आरक्षण आंदोलनावरून परतताना इंदापूरच्या युवकाचा भीषण अपघातात मृत्यू; दोन सहकारी गंभीर जखमी

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
17
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
8
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
2
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
2
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
25
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post
मराठा आरक्षण आंदोलनावरून परतताना इंदापूरच्या युवकाचा भीषण अपघातात मृत्यू; दोन सहकारी गंभीर जखमी

मराठा आरक्षण आंदोलनावरून परतताना इंदापूरच्या युवकाचा भीषण अपघातात मृत्यू; दोन सहकारी गंभीर जखमी

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In