• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 5, 2026
in Blog
0
किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

टँकरने तातडीने पाणीपुरवठा करण्याची मागणी; नळ पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

चंदगड | प्रतिनिधी

RelatedPosts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चंदगड तालुक्यातील किल्ले पारगडवर गेल्या सहा ते सात वर्षांपासून पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरवर्षी मार्च महिन्यापासून गडावरील ऐतिहासिक तलाव आणि विहिरी कोरड्या पडत असून यंदाही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे पर्यटक, शिवप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गडावरील नागरिक व पर्यटकांना बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन पाच वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, आजतागायत ही योजना पूर्णत्वास गेलेली नाही. यासाठी ग्रामस्थांनी चंदगड पंचायत समितीसमोर तीन वेळा आमरण उपोषण केले. प्रत्येक वेळी प्रशासनाने आश्वासने दिली; परंतु प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा आणि मॅरेथॉन स्पर्धेसमोर मोठे आव्हान

दरवर्षी ६ जून रोजी किल्ले पारगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहीद जवान वेल्फेअर असोसिएशन (कार्वे), पारगड ग्रामस्थ तसेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील शिवप्रेमी यांच्या पुढाकारातून हा सोहळा आयोजित केला जातो. हजारो शिवभक्त यावेळी गडावर मुक्कामी असतात.

तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी ‘आऊट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी देशभरातून सुमारे तीन हजार धावपटू गडावर दाखल होणार आहेत. मात्र, पाण्याअभावी आयोजकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी

गडावरील पाणीटंचाई लक्षात घेता ५ आणि ६ जून रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. गडावरील घरांमध्ये मुक्कामी राहणारे धावपटू, शिवभक्त आणि पर्यटक यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तसेच तालुक्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी स्वतः गडावर उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यक सहकार्य करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तहसीलदारांना निवेदन

पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी या संदर्भात चंदगड तहसीलदारांना निवेदन सादर केले असून पाणीटंचाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा तोंडावर असताना प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे शिवप्रेमी, धावपटू आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

बहिरेवाडी नजीक भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

Related Posts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा
Blog

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026
20
Blog

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026
20
Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
47
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
27
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
7
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
4
Next Post
हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

ताज्या बातम्या

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In