• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा; केवळ नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर अन्याय नको – वैभव नाईक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा; केवळ नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर अन्याय नको – वैभव नाईक
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

कणकवली | प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांवर समान कारवाई करावी, मात्र केवळ नरडवे रोडवरील गरीब स्टॉलधारक आणि दुकानदारांवर अन्याय होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटलपर्यंतच्या परिसरातील स्टॉल व दुकाने हटविण्याबाबत सोमवारी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. यानंतर वैभव नाईक यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी गौरी पाटील यांची भेट घेत याबाबत जाब विचारला.

यावेळी नरडवे रोडवरील दुकानदार व स्टॉलधारकही उपस्थित होते. त्यांनी आपली दुकाने व स्टॉल रस्त्यावर नसून फुटपाथच्या बाहेरील जागेत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या व्यवसायामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नसल्याचा दावा त्यांनी केला.

“केवळ नरडवे रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची घाई का केली जात आहे?” असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला. तसेच शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना लेखी नोटिसा देऊन योग्य मुदत देण्यात यावी आणि त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील दिवसापासून कणकवली बाजारपेठेतील अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मात्र, “अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवावीत. कोणावरही निवडक कारवाई होऊ नये,” असे ठाम मत वैभव नाईक यांनी यावेळी व्यक्त केले.

या भेटीदरम्यान नगरपंचायत प्रशासन, स्टॉलधारक आणि स्थानिक नागरिकांमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत चर्चा झाली असून, नगरपंचायतीच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

Next Post

प्रशासनाकडून माहिती अधिकार अर्जदारांविषयी अवमानकारक शब्दप्रयोग; चौकशीची मागणी

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
25
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
8
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
3
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
0
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
4
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
2
Next Post

प्रशासनाकडून माहिती अधिकार अर्जदारांविषयी अवमानकारक शब्दप्रयोग; चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In