• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रशासनाकडून माहिती अधिकार अर्जदारांविषयी अवमानकारक शब्दप्रयोग; चौकशीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
0
SHARES
48
VIEWS
Ad 1

अहिल्यानगर | प्रतिनिधी

माहिती अधिकार कायदा 2005 हा नागरिकांना शासनाच्या कारभारात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी आणि प्रशासनाला जबाबदार धरण्यासाठी महत्त्वाचे साधन मानला जातो. या कायद्याअंतर्गत नागरिकांना माहिती मागण्याचा वैधानिक अधिकार असून, संबंधित शासकीय कार्यालयांनी नियमानुसार व निर्धारित कालावधीत माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

मात्र, काही शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांविषयी अवमानकारक, बदनामीकारक आणि दिशाभूल करणारे शब्दप्रयोग कागदपत्रांमध्ये वापरले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून संबंधित प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, माहिती मागणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर आणि वैधानिक हक्क आहे. त्यामुळे माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या व्यक्तींना अपमानास्पद वागणूक देणे, त्यांच्याविषयी चुकीचे किंवा आक्षेपार्ह उल्लेख करणे तसेच मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करणे हे कायद्याच्या भावनेला बाधा आणणारे आहे.

दीपक पाचपुते यांनी प्रशासनातील अशा प्रकारांमुळे पारदर्शकतेला धक्का बसत असून नागरिकांचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास कमी होत असल्याचे नमूद केले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पारदर्शक प्रशासनासाठी प्रमुख मागण्या :

  • माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ (१) (ब) नुसार आवश्यक माहिती सर्व शासकीय कार्यालयांनी स्वतःहून सार्वजनिक करावी.
  • माहिती मागणाऱ्या नागरिकांशी सन्मानपूर्वक वागणूक द्यावी.
  • अधिकृत पत्रव्यवहारात अवमानकारक, दिशाभूल करणारे किंवा आक्षेपार्ह शब्दप्रयोग टाळावेत.
  • अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याबाबत नियमित प्रशिक्षण देऊन प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.

या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Previous Post

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा; केवळ नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर अन्याय नको – वैभव नाईक

Next Post

कर्जतमधील आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
25
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
8
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
3
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
0
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
4
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
2
Next Post
कर्जतमधील आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

कर्जतमधील आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In