• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बहिरेवाडी नजीक भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 5, 2026
in Blog
0
बहिरेवाडी नजीक भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आई-वडील आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे आजरा तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

  • दीपक दत्तात्रय चांदे (वय ३५)
  • शोभा दीपक चांदे (वय ३०)
  • जय दीपक चांदे (वय ९)
  • पूर्वा दीपक चांदे (वय ७)

मिळालेल्या माहितीनुसार, चांदे कुटुंब मूळचे माद्याळ (दुंडगे) येथील रहिवासी असून ते रोजगारानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होते. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त ते गावी आले होते. गुरुवारी होन्याळी येथे नातेवाईकांना भेटून ते दुचाकीवरून (एमएच ०९ ईवाय ९७८३) माद्याळकडे परतत होते.

सायंकाळच्या सुमारास बहिरेवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसापासून बचावासाठी दीपक चांदे यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली असताना आजऱ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने (एमएच १२ वायक्यू १४६५) दुचाकीला जोरदार धडक दिली. पाऊस आणि वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुचाकीवर चढला.

अपघात इतका भीषण होता की चौघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, अपघाताची तीव्रता मोठी असल्याने कोणालाही वाचविणे शक्य झाले नाही.

घटनेनंतर आयशर चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

मुंबईहून सुट्टीसाठी आनंदाने गावी आलेल्या संपूर्ण कुटुंबाचा एका क्षणात झालेला अंत गावकऱ्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला असून माद्याळ, बहिरेवाडी आणि आजरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Previous Post

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

Next Post

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

Related Posts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा
Blog

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026
20
Blog

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026
20
Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
47
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
28
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
7
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
4
Next Post
किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

ताज्या बातम्या

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In