• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून योग्य भरपाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून योग्य भरपाईची मागणी
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

हदगाव | प्रतिनिधी

हदगाव तालुक्यातील खरबी शिवारासह परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतांतील केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

यावर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे वळत मोठ्या अपेक्षेने उत्पादन घेतले होते. मात्र, काल रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आलेल्या तुफानी वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. खरबी व आजूबाजूच्या गावांतील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची झाडे कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

घटनेची माहिती मिळताच तलाठी कोथळकर आणि कृषी सहाय्यक संगमवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली. नुकसानीचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ तुटपुंजी मदत न देता प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी खरबीचे सरपंच हेमंत नरवाडे यांनी केली आहे. त्यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन तत्काळ मदतीची घोषणा करावी, असे आवाहनही केले.

अवकाळी पावसामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता केळी पिकाच्या नुकसानीमुळे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असून शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

शिरूर शहरासाठी सीसीटीव्ही निरीक्षण प्रकल्पाची मागणी; महिला व बालसुरक्षेसाठी आयेशा सय्यद यांचे आमदार कटके यांना निवेदन

Next Post

भाजप किसान मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा सरचिटणीसपदी सोमनाथ शालिग्राम पाटील यांची निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
113
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

भाजप किसान मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा सरचिटणीसपदी सोमनाथ शालिग्राम पाटील यांची निवड

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In