लोहारा | प्रतिनिधी :
लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयात शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. पवन पवार (मॅनेजर, जना मल्टीस्टेट बँक, लोहारा) हे होते, तर श्री. शंकरजी जाधव (पालक प्रतिनिधी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री. शंकरजी जाधव यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रनिर्मिती, सामाजिक परिवर्तन आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात श्री. पवन पवार यांनी महाविद्यालयात सातत्याने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे यांनी केले.
यावेळी दत्तात्रय पोतदार, प्रा. रमेश गिराम, प्रा. प्रियांका जमादार, प्रा. प्राजक्ता लकडे, वैष्णवी सुतार, अनंत मते, राणी माटे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
