• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूर शहरासाठी सीसीटीव्ही निरीक्षण प्रकल्पाची मागणी; महिला व बालसुरक्षेसाठी आयेशा सय्यद यांचे आमदार कटके यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
शिरूर शहरासाठी सीसीटीव्ही निरीक्षण प्रकल्पाची मागणी; महिला व बालसुरक्षेसाठी आयेशा सय्यद यांचे आमदार कटके यांना निवेदन
0
SHARES
231
VIEWS
Ad 1

शिरूर | प्रतिनिधी

शिरूर शहरातील नागरिकांची सुरक्षितता, महिला व बालकांचे संरक्षण, वाहतूक व्यवस्थापन तसेच वाढत्या गुन्हेगारी घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही निरीक्षण प्रकल्प तातडीने राबविण्यात यावा, अशी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलिम सय्यद यांनी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

महाराष्ट्र शासनाच्या ‘सेफ सिटी’ संकल्पनेनुसार शहरांमध्ये आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यास प्राधान्य दिले जात असून, शिरूर शहरातही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले शहरीकरण, वाढती वाहतूक कोंडी तसेच विविध गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालय परिसर, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

महिला व लहान मुलींवरील अत्याचार, छेडछाड आणि इतर गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची ठरेल, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, तसेच गुन्ह्यांचा तपास, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीतील कार्यवाही अधिक प्रभावीपणे करता येईल.

यावेळी आयेशा कलिम सय्यद म्हणाल्या, “शिरूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि बालकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही निरीक्षण प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल. शासनाच्या विशेष निधीतून अथवा संबंधित योजनांमधून आवश्यक निधी उपलब्ध करून हा प्रकल्प तातडीने मंजूर करण्यात यावा.”

शासनाच्या संबंधित योजना किंवा विशेष निधीतून शिरूर शहरासाठी सीसीटीव्ही निरीक्षण प्रकल्प मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा आणि सदर प्रकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदन सादर करताना शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, नगरसेवक अभिजीत पाचर्णे, कलिम सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा श्रुतिका झांबरे तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलिम सय्यद उपस्थित होत्या.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

कंत्राट मुदतवाढीच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; रिलायन्सच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून योग्य भरपाईची मागणी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून योग्य भरपाईची मागणी

अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून योग्य भरपाईची मागणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In