• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

लोहारा प्रतिनिधी

उमरगा : मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) उमरगा शाखेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाप शाखेचे अध्यक्ष प्रदीप पाटील होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मसापचे कार्यवाह गुंडू दुधभाते यांनी शासनाच्या परिपत्रकातील सूचनांचे वाचन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या समृद्ध साहित्याचा प्रसार विद्यार्थी व युवकांपर्यंत व्हावा, यासाठी ग्रंथदिंडी, व्याख्याने, शाहिरी, मुलाखती तसेच विविध साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वक्त्यांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्याला अमूल्य योगदान दिले. शोषित, वंचित, श्रमिक आणि कष्टकरी समाजाचे वास्तव आपल्या साहित्याद्वारे त्यांनी प्रभावीपणे मांडले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली असून जागतिक स्तरावरही त्यांना एक लढवय्या साहित्यिक म्हणून ओळख मिळाली.

शासनाच्या निर्णयानुसार १ ऑगस्ट हा अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जात असून, नवोदित लेखकांना लेखन आणि वाचनाची प्रेरणा मिळावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विद्यापीठे, महाविद्यालये व संलग्न संस्थांमध्ये विविध साहित्यिक उपक्रम राबविण्याचे नियोजन सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

मसाप शाखेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य प्रा. किरण सगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी कवी कमलाकर भोसले यांनी अण्णाभाऊ साठे यांची “स्मशानातील सोने” ही कथा प्रभावी शैलीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी काशिनाथ बिराजदार यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन परमेश्वर सुतार यांनी केले. कार्यक्रमास विश्वनाथ महाजन, बाळासाहेब माळी, प्रा. शिवराम अडसूळ, अजित पाटील यांच्यासह साहित्यप्रेमी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची साई ट्रस्ट JNPT शाळेच्या PTA उपाध्यक्षपदी निवड

Next Post

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In