• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथील जाळीवस्ती परिसरात बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका शेतात कुत्र्याचे मुंडके व दोन पाय अर्धवट अवस्थेत आढळून आल्याने वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून हा प्रकार बिबट्याचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदवला आहे. यानंतर परिसरात तातडीने पिंजरा लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

स्थानिक शेतकरी अर्जुन ढोले, बाळासाहेब साळवे, किसन साळवे आणि दादा ढोले यांनी ही बाब प्रतिनिधी श्रीरंग साळवे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

वनकर्मचाऱ्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. हे ठसे काही अंतरापर्यंत स्पष्टपणे दिसत होते. तसेच कुत्र्याच्या मृतदेहावरील जखमा आणि शरीराचा फडशा पाडण्याची पद्धत पाहता हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी या परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची आवश्यकता असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी भगत मॅडम यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना त्वरित पिंजरा उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, बिबट्याचा वावर लक्षात घेता नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात किंवा एकांत ठिकाणी जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या घटनेमुळे चांभुर्डीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

खडकवासला धरणातून मुठा नदीत ३,८२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Next Post

नात्याला काळीमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार; नेर पोलिसांत पोक्सोचा गुन्हा दाखल

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

नात्याला काळीमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार; नेर पोलिसांत पोक्सोचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In