आज कळंब येथे शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा संपन्न झाला.या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता, यावेळेस शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीकविमा योजनांचा योग्य लाभ मिळावा, हमीभाव वाढवावा, तसेच वाढत्या शेतमाल उत्पादन खर्चाविरोधात उपाययोजना कराव्यात यांसारख्या मुद्द्यांवर सरकार विरोध रोष व्यक्त केला.मोर्चाला संबोधित करताना, शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
नैसर्गिक आपत्ती, पीक विमा योजनेतील त्रुटी, बाजारातील अस्थिरता आणि सरकारच्या धोरणातील कमतरता यामुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटात आले आहे.
कर्जमाफीसह, हमीभावावर कायदेशीर संरक्षण मिळावे, पिकांच्या नुकसान भरपाईचे त्वरीत वितरण व्हावे आणि वीज दरात सवलत मिळावी, अशा मागण्यांसाठी आवाज उठवला.खा. संजय भाऊ देशमुख माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके, प्रवीण देशमुख, अरविंद वाढोणकर, राजू पोटे, सुदाम पवार , विशाल सरोदे, गजानन पंचबुद्दे, नारायण चव्हाण, गुरुदेव राऊत, चंदन सहारे याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post