• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वढोलीत दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभा; दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव मंजूर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

गोंडपिपरी :
गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे सुरू करण्यात आलेले दारूचे दुकान कायमस्वरूपी हटविण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने दि. २५ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भात एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला.

सुमारे ३० वर्षांपासून दारूबंदी असलेल्या वढोली गावात दारूचे दुकान सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. प्रशासनाने दिलेला तात्पुरता बंदचा आदेश हा अंतिम उपाय नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी दारू दुकान कायमस्वरूपी हटविण्याची मागणी लावून धरली आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

या मागणीसाठी ग्रामस्थांनी यापूर्वी उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर गुरुवारी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेला संवर्ग विकास अधिकारी संजय पुप्पलवार, ठाणेदार रमेश हत्तीगोटे, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अभिनंदन कांबळे, दुय्यम निरीक्षक सी.टी. दरोडे, अतुल भिवगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जगदीश कापटे, नायब तहसीलदार शेखर वेटे, विस्तार अधिकारी जीवन प्रधान, मंडळ अधिकारी सुकेसनी कांबळे, तलाठी अश्विनी शेळके, पोलिस उपनिरीक्षक मंगेश कराडे तसेच ग्रामसेवक जितेंद्र खोब्रागडे उपस्थित होते.

ही विशेष ग्रामसभा सकाळी ११ वाजता सुरू होऊन रात्री ९ वाजेपर्यंत चालली. दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी पावसाची हजेरी लागूनही ग्रामस्थांचा उत्साह कायम होता. गावातील सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. शेतीचा हंगाम सुरू असतानाही शेतकरी, मजूर आणि सर्व स्तरातील नागरिकांनी आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून ग्रामसभेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

ग्रामसभेत एकूण १६१४ मतदारांपैकी सुमारे १०४४ मतदारांनी उपस्थित राहून दारू दुकान हटविण्याच्या बाजूने लेखी स्वाक्षरीद्वारे आपले मत नोंदविले.

चक्का जाम आंदोलनानंतर गुन्हे दाखल

दारू दुकान सुरू झाल्यानंतर ते बंद करण्याच्या मागणीसाठी गोंडपिपरी-मूल मार्गावर १२ तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर सरपंच राजेश कवठे, शिवसेना तालुका प्रमुख सूरज माडूरवार, रविंद्र कोहपरे, मनिषा कोहपरे, मोहन चुदरी, अखिल कोहपरे, श्रीकांत कानकाटे, नितीन शेकृतवार, भारत धंदरे, घनश्याम कोहपरे, रुपेश मेदाडे, सुरेश उपासे, संदीप लाटकर, राहुल देवाडे, शैलेश चौधरी, भगीरथ लांबाडे, गोपी आत्राम, गौरव झरकर, किशोर खरबनकर, रंजीत आभारे, मेघश्याम आभारे, राणी कोहपरे, रोहिणी कवठे, अल्का गेडाम, माया पोरटे आणि छबू आरेकर या २६ आंदोलनकर्त्यांवर बीएनएस आणि क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Tags: Satish Neware
Previous Post

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात विजेचा लपंडाव; तब्बल १२ दिवसांपासून ‘दामिनी’ बेपत्ता

Next Post

गोंडपिपरी तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात संपन्न

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
3
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
2
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
11
Next Post

गोंडपिपरी तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In