• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात विजेचा लपंडाव; तब्बल १२ दिवसांपासून ‘दामिनी’ बेपत्ता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

गोंडपिपरी : प्रतिनिधी

तालुक्यातील राजकीय वारसा लाभलेल्या आणि ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या विठ्ठलवाडा गावात गेल्या तब्बल १२ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्याची सुरुवात होताच गावातील वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

RelatedPosts

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

उन्हाळा संपत आला असला तरी उकाडा कायम असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच रात्री-अपरात्री तासन्तास वीज गायब होत असल्याने लहान मुले, वृद्ध, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दिवसभर कष्ट करून परतणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांना रात्री शांत झोप घेणेही कठीण झाले आहे.

गावातील नागरिकांच्या मते, तांत्रिक बिघाड आणि वादळी वाऱ्यांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. मात्र या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात महावितरण प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गावात विजेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी जबाबदार कर्मचारी उपलब्ध नसल्याने संपूर्ण व्यवस्था रामभरोसे सुरू असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

सततच्या बत्तीगुलमुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “गावातील ही वीज समस्या नेमकी कधी सुटणार?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

बॉक्स

“महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचे हाल”

“गोंडपिपरी येथील महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विठ्ठलवाडा येथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या १२ दिवसांपासून या भागात रात्रभर वीजपुरवठा बंद राहत आहे. गावातील विजेची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी जणसेवक कार्यरत नसल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मग आम्ही दाद मागायची कोणाकडे?”
— नितीन काकडे, माजी सरपंच, विठ्ठलवाडा

Previous Post

गोंडपिपरीतून अवैध दारू वाहतूक जोमात; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Next Post

वढोलीत दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभा; दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव मंजूर

Related Posts

Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
12
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
3
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
1
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
Blog

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026
2
Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
8
Next Post

वढोलीत दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभा; दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव मंजूर

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In