• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागद येथून बेकायदेशीर वाळू वाहतूक; हायवासह २५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

कन्नड/प्रतिनिधी :
तालुक्यातील नागद येथून कन्नड शहरात विनापरवाना वाळू वाहतूक करणारा एक हायवा वाहन कन्नड शहर पोलिसांनी पकडून वाळूसह तब्बल २५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

याबाबत कन्नड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव धोंडकर हे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक मिर्जा बेग, पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि मयूर वाळुंजकर यांच्यासह चाळीसगाव रोड परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत हिवरखेडा रोडने वाळूने भरलेला हायवा कन्नड शहरात येत असल्याची माहिती मिळाली.

माहितीनुसार पोलिसांनी पिशोर नाका येथे सापळा रचला. काही वेळात पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा १० टायर हायवा (क्रमांक एमएच १४ एमएच ८९१४) येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली.

वाहन चालकाने आपले नाव रवींद्र गणेश राठोड (वय ३५, रा. चंदिकावाडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे सांगितले. तसेच वाहन मालकाचे नाव रघुनंदन उर्फ भोला एकनाथ पाटील (रा. कोठली, ता. भडगाव, जि. जळगाव) असल्याचे सांगितले. मालकाच्या सांगण्यावरून विनापरवाना अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याची कबुली चालकाने दिली.

या कारवाईत पोलिसांनी २५ लाख रुपये किंमतीचा हायवा आणि त्यामधील ४ ब्रास वाळू, प्रत्येकी १० हजार रुपये प्रमाणे ४० हजार रुपये किंमतीची वाळू असा एकूण २५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त वाहन कन्नड शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नासेर पठाण आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश नलावडे पुढील तपास करत आहेत.

Previous Post

गोंडपिपरी तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात संपन्न

Next Post

जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व; शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांचे शहरभर कौतुक

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
3
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
2
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
11
Next Post

जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व; शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांचे शहरभर कौतुक

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In