• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्याधाम प्रशाला, लोणी येथे सभागृहाचे भूमिपूजन आणि गुणवंतांचा सत्कार उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

लोणी प्रतिनिधी

माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी व ग्रामपंचायत लोणी यांच्या सहकार्याने श्री भैरवनाथ विद्याधाम, लोणी येथे शाळेच्या समोरील प्रवेशद्वार व बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार समारंभ शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

सकाळी ९:३० वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महसूल विभाग, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव कैलास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या अंकिताताई वाळुंज, लोणी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनिल थोरात, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुबीन मुंडे, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणीचे अध्यक्ष उदय वाळुंज, खजिनदार व उद्योजक बाळासाहेब गायकवाड तसेच पारगाव पोलीस स्टेशनचे कांडगे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिक्षण आणि विकासावर भर

यावेळी बोलताना कैलास गायकवाड यांनी माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. “शाळेचा पायाभूत विकास आणि विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन एकत्रितपणे झाल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधिक वाढले आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

या कार्यक्रमाला पोलीस पाटील संदीप आढाव, उपसरपंच राजेंद्र वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य महिला भगिनी, शरद बँक संचालक अशोक आदक पाटील, माजी सरपंच दिलीप वाळुंज, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश वाळुंज, जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाळुंज, बाळशिराम वाळुंज, चंद्रकांत गायकवाड, अरुण साकोरे, पिंटू पडवळ, सुधीर सोनार, अनिकेत नाईक यांच्यासह शाळेचे शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती, पालक, पत्रकार आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दाते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज पाटील यांनी केले.

Tags: Tejas Walunj
Previous Post

जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व; शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांचे शहरभर कौतुक

Next Post

कडेगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मोहरम गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा दिमाखदार सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
3
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
2
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
11
Next Post

कडेगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मोहरम गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा दिमाखदार सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In