• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कडेगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मोहरम गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा दिमाखदार सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

कडेगाव : प्रतिनिधी

सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्य जपणाऱ्या कडेगाव शहरात मोहरम निमित्त गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा दिमाखदार आणि पारंपरिक सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यास उपस्थित राहिले होते. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळाली.

RelatedPosts

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कडेगाव येथे गेल्या १७५ वर्षांपासून मोहरम उत्सवातून सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली जात आहे. यावर्षीही ही परंपरा मोठ्या उत्साहात अनुभवायला मिळाली.

शुक्रवार दि. २६ रोजी सकाळी कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड आदी गावांतील मानकऱ्यांना वाजत-गाजत कडेगावमध्ये आणण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून सकाळी ११ वाजता मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आला आणि भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला.

सातभाई ताबूत विजबोर्ड परिसरात आल्यानंतर देशपांडे, हकीम आणि शेटे यांचे ताबूत त्यात सहभागी झाले. त्यानंतर बागवान, अत्तार, शेटे तसेच अन्य उंच ताबूत पारंपरिक मानाप्रमाणे उचलण्यात आले. पुढे पाटील यांचा भव्य आणि आकर्षक ताबूत उचलण्यात आला आणि खऱ्या अर्थाने ताबूतांच्या गळाभेटींचा सोहळा सुरू झाला.

यावेळी “या हुसेन”, “हक हुसेन”, “इमाम हुसेन झिंदाबाद”, “मौला अली झिंदाबाद”, “एक नारा हैदरी, या अली या अली” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सातभाई, पाटील, बागवान, अत्तार, हकीम आणि देशपांडे या मानाच्या ताबूतांच्या प्राथमिक भेटी दुपारी १२ वाजता संपन्न झाल्या.

या भेटींना “राम-भरताची भेट” असे संबोधले जाते. भाविकांनी आकाशात फेटे व टोप्या उंचावत जल्लोषात या भेटींचे स्वागत केले. पावसाच्या रिपरिपीत आणि जोरदार वाऱ्यात झालेल्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटींनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

यानंतर सर्व ताबूत वाजत-गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) येथे दाखल झाले. मार्गात तांबोळी तसेच अन्य ताबूतही सहभागी झाले. त्यानंतर माईनकर, इनामदार आणि सुतार यांचे उंच व आकर्षक ताबूत उचलण्यात आले.

मोहरम मैदानावर सर्व ताबूत एकत्र आल्यानंतर मेलवाल्यांकडून “महान भारत देश आमुचा घुमवू जयजयकार”, “प्यारा प्यारा हमारा देश प्यारा”, “हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे” अशी राष्ट्रीय एकात्मतेची गीते सादर करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसरात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर हिंदू मानकऱ्यांच्या हस्ते मसूद माता ताबूत पंजे आणि बारा इमाम पंजे आणण्यात आले. पारंपरिक मानाप्रमाणे मुख्य भेटींचा सोहळा पार पडला. दुपारी तीन वाजता भेटी सोहळ्याची सांगता झाली आणि सर्व ताबूत आपापल्या ठिकाणी परतले.

या सोहळ्यास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, डॉ. विक्रम कदम, पंचायत समिती सभापती डॉ. जितेश कदम, विश्वतेज देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी पवन म्हेत्रे, नगरसेवक, ताबूत मालक, मानकरी आणि हजारो भाविक उपस्थित होते.

मोहरम मार्ग काँक्रिटीकरणामुळे ताबूत भेटी सुकर

मोहरम ताबूत भेटीच्या वेळी खांदेकरी आणि तोरणीवाल्यांना अरुंद रस्त्यांमुळे मोठी कसरत करावी लागत होती. मात्र कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे संपूर्ण मोहरम मार्गावर अंडरग्राउंड गटार व काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्याने यावर्षी ताबूतांच्या भेटी अधिक सुकर झाल्या.

Previous Post

विद्याधाम प्रशाला, लोणी येथे सभागृहाचे भूमिपूजन आणि गुणवंतांचा सत्कार उत्साहात संपन्न

Next Post

‘श्रीं’ची पालखी आज रिसोड शहरात; भक्तिमय वातावरणात स्वागताची जय्यत तयारी

Related Posts

Blog

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 14, 2026
1
Blog

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

August 14, 2026
2
वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 14, 2026
2
Blog

अंजनवाडी येथील जन्म नोंदणीबाबत हरकत नोंदविण्याचे आवाहन

August 14, 2026
6
डेगवे येथे पिंपळाचे झाड कोसळले; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
Blog

डेगवे येथे पिंपळाचे झाड कोसळले; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

August 14, 2026
11
Blog

ग्रामपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास तुर्तास स्थगिती:

August 14, 2026
4
Next Post

‘श्रीं’ची पालखी आज रिसोड शहरात; भक्तिमय वातावरणात स्वागताची जय्यत तयारी

ताज्या बातम्या

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

August 14, 2026
दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

August 14, 2026
राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In