• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील व साहित्यिक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना पहिला पुरस्कार जाहीर

अंबाजोगाई | प्रतिनिधी

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

थोर समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांच्या कार्याला आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या साधनाताई आमटे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी साधना सेवाभावी संस्थेच्या वतीने “साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार” सुरू करण्यात आला आहे. साधनाताई आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (१९२६–२०२६) या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली असून, यंदाचा पहिला पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील या दांपत्याला जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार गुरुवार, दिनांक ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आनंदवन, वरोरा (जि. चंद्रपूर) येथील स्वरानंदवन हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भवरलालजी जैन उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे हे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत. यावेळी निवृत्त सनदी अधिकारी व गझलकार दिलीप पांढरपट्टे, साहित्य समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, आनंदवनचे डॉ. विकास आमटे व डॉ. भारती आमटे तसेच लोक बिरादरी प्रकल्प, भामरागडचे पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे उपस्थित राहणार आहेत.

संस्थेच्या अध्यक्ष डॉ. शुभदा राठी-लोहिया आणि सचिव दगडू लोमटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

बाबा आमटे आणि साधनाताई यांनी कुष्ठरोगी, अंध, अपंग, मूकबधिर तसेच आदिवासी बांधवांसाठी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पुनर्वसन आणि रोजगाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. स्वाभिमानाने आणि सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क समाजातील वंचित घटकांना मिळावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. साहित्य, कला, संगीत आणि ललितकला क्षेत्रातील व्यक्तींनीही बाबा आमटे यांच्या कार्यात मोलाचे योगदान दिले असून, त्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.

पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुष्पहार आणि एक लाख रुपये असे आहे. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय लेखन आणि साहित्य प्रचार-प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अनुराधा पाटील आणि प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील या दांपत्याची पहिल्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अंबाजोगाईसारख्या गाववजा शहरातून अशा स्वरूपाचा राज्यस्तरीय पुरस्कार सुरू केल्याबद्दल साहित्य, कला, संगीत आणि ललितकला क्षेत्रातील मान्यवरांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Previous Post

सैनिक स्कूल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि शिस्त यांचा दुहेरी संगम – पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत

Next Post

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
204
Next Post

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In