• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सैनिक स्कूल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि शिस्त यांचा दुहेरी संगम – पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

योगेश्वरी सैनिक स्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

अंबाजोगाई | प्रतिनिधी

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी सैनिक स्कूलचा प्रवेशोत्सव कार्यक्रम सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक डॉ. सुरेश खुरसाळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत उपस्थित होते. तसेच विशेष निमंत्रित म्हणून अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे आणि सैनिकी कल्याण विभागाचे उपसंचालक कर्नल सतीश हंगे उपस्थित होते.

योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सैनिक स्कूलची या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात झाली असून इयत्ता सहावीच्या पहिल्या तुकडीचा प्रवेशोत्सव ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक हलगीच्या नादात आणि मुलींच्या ढोल पथकाच्या वादनात उत्साहात पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले की, “मी स्वतः सहावीपासून सैनिकी शाळेत शिक्षण घेतले आहे. सैनिक स्कूलमध्ये शिक्षणासोबत शिस्तीचे धडे दिले जातात. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास आणि देशसेवेची भावना निर्माण करण्यासाठी शिस्त अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षण आणि शिस्त यांचा संगम विद्यार्थ्यांना सजग नागरिक बनवतो. आज विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांना पाहून मला माझ्या सैनिकी शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण झाली. त्याच शिस्तीमुळे मी आयपीएस अधिकारी बनू शकलो, याचा मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनीही देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करावे,” असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमात बोलताना योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉ. सुरेश खुरसाळे म्हणाले की, “१९१७ साली लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या चतुःसूत्री कार्यक्रमातून योगेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. देशभक्तीची भावना जपत संस्थेने अनेक वर्षे कार्य केले आहे. गेल्या चार वर्षांपासून संरक्षण मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर आणि विविध तपासणीनंतर सैनिक स्कूलला मान्यता मिळाली. आजचा प्रवेशोत्सव हा संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे.”

संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांनी या सैनिक स्कूलमधून शिक्षण घेऊन देशसेवेत योगदान द्यावे, असे मत व्यक्त केले.

सैनिक स्कूलचे प्राचार्य मेजर एस. पी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांकडून देशसेवेची प्रतिज्ञा म्हणवून घेतली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर यांनी केले.

या कार्यक्रमास योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक, अंबाजोगाईतील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश्वरी सैनिक स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

लव्ह, प्यार आणि धोका! लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीतील परिचारिकेची १३ लाखांसह ३ तोळे सोन्याची फसवणूक

Next Post

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
204
Next Post

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In