• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी

मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मार्डा सर्कलमधील दांडगाव-मार्डा डॅम परिसरात काही दिवसांपूर्वी एका ४५ ते ५० वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृत्यूचे कारण अस्पष्ट असताना मारेगाव पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत अवघ्या २४ तासांत हा मृत्यू नसून खून असल्याचे स्पष्ट केले.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

या प्रकरणाचा तपास करताना मारेगाव पोलीस आणि शिरपूर पोलीस यांनी संयुक्तपणे दोन पथके तयार करून तपासाला गती दिली. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटवून खून प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या तपासात या खून प्रकरणात एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र त्यावेळी दोन आरोपी फरार होते.

दरम्यान, तत्कालीन पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या कार्यकाळात या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यांच्या बदलीनंतर नव्याने तपासाची दिशा ठरवून पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी उर्वरित दोन आरोपींनाही अटक करण्यात यश मिळवले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रशांत पंढरी घागी आणि सुनील निकोडे यांचा समावेश आहे. दोन्ही आरोपींना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असून त्यानंतर त्यांना यवतमाळ कारागृहात पाठविण्यात आले आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार यांच्यासह दिगंबर किनाके, सागर दिपेवार, शंकर बारेकर, संभा लेनगुडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मारेगाव परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

Previous Post

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

Next Post

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
204
Next Post

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In