• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा लढा; ८ जुलैला महावितरण कार्यालयातच भरणार वर्ग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा लढा; ८ जुलैला महावितरण कार्यालयातच भरणार वर्ग
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

काळकुप | प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळकुप येथील विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली शाळेची जुनी इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने शासनाने तिचे निर्लेखन केले असून त्या इमारतीत वर्ग भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. इमारतीला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने इमारत कोसळण्याची भीती अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

गावातील दुसऱ्या ठिकाणी नवीन शाळा इमारत व वर्गखोल्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. मात्र त्या परिसरातून महावितरणच्या उच्चदाब वीजवाहिन्या, वीज खांब, डीपी आणि मुख्य विद्युत वाहिन्या जात असल्याने तेथे शाळा सुरू करता येत नाही. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याने नवीन इमारत तयार असूनही ती वापराविना पडून आहे.

या समस्येबाबत ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाने महावितरण, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विभागांकडे वेळोवेळी निवेदने देऊन अनेकदा पाठपुरावा केला. मात्र अद्यापही वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर दि. ७ जुलै रोजी काळकुप येथील हनुमान मंदिर सभामंडपात शाळेचे वर्ग भरविण्यात येणार आहेत. तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महावितरण विभागीय कार्यालय, अहिल्यानगर येथे विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रतीकात्मक स्वरूपात शाळाच भरविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नवीन शाळा इमारतीतील वर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या वीजवाहिन्या, डीपी व वीज खांब त्वरित स्थलांतरित करण्यात यावेत, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Previous Post

रावेतमध्ये ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित; ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल

Next Post

साकुरीतील वीज रोहित्रावर वेलींचे साम्राज्य; महावितरणच्या दुर्लक्षामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
20
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
15
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
28
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
24
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post

साकुरीतील वीज रोहित्रावर वेलींचे साम्राज्य; महावितरणच्या दुर्लक्षामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In