• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाहूवाडी-पन्हाळावासीय सेवा संघातर्फे १५० गुणवंतांचा गौरव; अविनाश पाटील यांना ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न’ पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

बांबवडे | प्रतिनिधी :
शाहूवाडी-पन्हाळावासीय सेवा संघातर्फे पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा शिवाजी पार्क येथील विद्याभवन सभागृहात उत्साहात पार पडला. दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी सर्व गुणवंतांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि कै. शं. रा. सनगर गुरुजी शिष्यवृत्ती प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न पुरस्कार २०२६’. विरळे येथील रहिवासी व श्लोक को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अविनाश पाटील यांना त्यांच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सपत्नीक प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासाहेब लाड होते, तर मुंबई विद्यापीठाच्या निरंतर विभागाचे निवृत्त संचालक डॉ. दिलीप पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी निवृत्त नौदल अधिकारी एन. डी. चाळके, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, निवृत्त अधीक्षक अभियंता डी. वाय. कदम, गोकुळचे व्यवस्थापक डॉ. टी. एस. कडवेकर, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सुवर्णकार दत्तात्रय पोतदार, अनिता नलगे, उषा चाळके, प्रकाश कोकाटे आणि सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सेवा संघाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी स्वागतपर भाषणाने केली. आर. बी. पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळाराम लाड यांनी केले, तर उपाध्यक्ष आनंदराव लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या गौरव सोहळ्यास शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Previous Post

पंजाबरावांचा नवा अंदाज! पुढील ३ दिवस महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार; पण ‘या’ तारखेला पाऊस पुन्हा गायब होणार!

Next Post

कोल्हापूर–रत्नागिरी प्रवासाला वेग; आंबा घाटात उभारला जाणार नवा भुयारी मार्ग

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
204
Next Post

कोल्हापूर–रत्नागिरी प्रवासाला वेग; आंबा घाटात उभारला जाणार नवा भुयारी मार्ग

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In