• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

करतोडणी स्पर्धेसह ‘कुरुंदवाड भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा २७ जुलैला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :
कुरुंदवाड येथे महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त पारंपरिक बिनदाती खोंडांची करतोडणी स्पर्धा आणि ‘कुरुंदवाड भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र कला सांस्कृतिक संघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹२५ हजार व चांदीची गदा, द्वितीय क्रमांकासाठी ₹१५ हजार व शिल्ड, तृतीय क्रमांकासाठी ₹१० हजार व शिल्ड, तर चतुर्थ क्रमांकासाठी ₹५ हजार व शिल्ड देण्यात येणार आहे.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘कुरुंदवाड भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये रामचंद्र (तात्या) डांगे (माजी नगराध्यक्ष), शशिकांत पाटील (लेखक व चित्रकार), धनपाल पोमाजे (बैलगाडी शर्यत क्षेत्रातील योगदान) आणि अॅड. धैर्यशील सुतार (उच्च न्यायालयाचे वकील) यांचा समावेश आहे.

तसेच डॉ. अविनाश झळके, श्रद्धा गायकवाड, प्रशांत शहापूरे, मिलिंद कुरणे, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई आणि सपोनि. संतोष माने यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. सतेज (बंटी) पाटील, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव (दादा) पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील तसेच नगराध्यक्षा मनिषाताई डांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला तानाजी आलासे, विशाल पाटील, दीपक परिट, प्रफुल पाटील, जितेंद्र साळुंखे, महावीर पाटील, शब्बीर बागवान, अली बागवान, संतोष शहा, सुनील कांबळे, सुरेश बिंदगे, एन. डी. पाटील आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन संतोष शहा यांनी केले.

Previous Post

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

Next Post

सलावत प्लॉटमध्ये घाणीचे साम्राज्य; २० जुलैपर्यंत स्वच्छता न झाल्यास जनआक्रोश मोर्चाचा इशारा

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post

सलावत प्लॉटमध्ये घाणीचे साम्राज्य; २० जुलैपर्यंत स्वच्छता न झाल्यास जनआक्रोश मोर्चाचा इशारा

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In