• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामसेवकाच्या निलंबनाच्या मागणीसाठी आडगावमध्ये आमरण उपोषण; गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
82
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

कन्नड तालुक्यातील आडगाव (पिशोर) येथील ग्राम विकास अधिकारी पोपटराव जंजाळ यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामस्थांच्या वतीने अमोल भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी संबंधित ग्रामसेवकावर गंभीर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत कन्नड न्यायालयामार्फत वसूल करण्यात आलेली रक्कम बँकेत जमा न करता अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

याशिवाय ग्रामसेवक सतत गैरहजर राहणे, नियमित ग्रामसभा न घेणे, इतिवृत्त नोंदवही अद्ययावत न ठेवणे, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी अयोग्य वर्तन करणे, नमुना क्रमांक ८ मध्ये खाडाखोड करणे तसेच विविध कामांसाठी नागरिकांकडून पैशांची मागणी केल्याचेही आरोप निवेदनात करण्यात आले आहेत.

ग्रामस्थांनी यापूर्वी पंचायत समिती, कन्नड येथेही तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशीत ग्रामनिधी व पाणीनिधीची रक्कम बँकेत जमा न केल्याचे आढळून आल्याचे सांगितले जात आहे. चौकशी अहवालात संबंधित अधिकारी दोषी असल्याचे नमूद करण्यात आले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

प्रशासनाने तातडीने ग्रामसेवकाचे निलंबन करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Previous Post

दोडामार्गात गोवा बनावटीच्या अवैध दारूवर पोलिसांची धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

Next Post

भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराविरोधात माढ्यात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
7
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
214
Next Post

भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराविरोधात माढ्यात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In