• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोडामार्गात गोवा बनावटीच्या अवैध दारूवर पोलिसांची धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

दोडामार्ग | प्रतिनिधी

दोडामार्ग पोलिसांनी अवैध गोवा बनावटीच्या दारूविक्रीविरोधात विशेष मोहीम राबवत दोन ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ११ हजार ७३० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली असून दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

RelatedPosts

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

देवगाव शनी गायरान प्रकरणी रवींद्र पवार यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पहिल्या कारवाईत कुडासे तिठा (ता. दोडामार्ग) येथे प्रवीण लक्ष्मण धरणे (वय ४१, रा. गावठाणवाडी, साटेली भेडशी) याच्याकडून ५ हजार १०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल उर्मिला रमेश सातार्डेकर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत देसाई करीत आहेत.

दुसऱ्या कारवाईत साटेली परमे रोड येथील एका घरामागील आडोशातून शुभम देवेंद्र धरणे (वय २५, रा. खैराटवाडी, साटेली भेडशी) याच्याकडून ६ हजार ६३० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय सुरेश जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश नाईक करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत देसाई, विठोबा सावंत, अंकुश नाईक, उमेश देसाई, महिला पोलीस कॉन्स्टेबल उर्मिला सातार्डेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव तसेच चालक पोलीस हवालदार अनिल कांबळे यांनी सहभाग घेतला.

दोडामार्ग तालुक्यात अवैध दारूविक्रीविरोधातील विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असून अशा बेकायदेशीर व्यवसायाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Previous Post

मुसळधार पावसात आयुक्त मनीषा खत्री यांची मखमलाबाद-कार्बन नाका परिसराची पाहणी

Next Post

ग्रामसेवकाच्या निलंबनाच्या मागणीसाठी आडगावमध्ये आमरण उपोषण; गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक

Related Posts

Blog

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026
0
Blog

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

July 8, 2026
2
Blog

देवगाव शनी गायरान प्रकरणी रवींद्र पवार यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

July 8, 2026
12
Blog

अयोध्या नगर–समर्थ नगर रस्त्यावरील नाली जीवघेणी; नागरिकांचा ठेकेदारावर अरेरावीचा आरोप

July 8, 2026
4
Blog

रेड अलर्टमध्येही मुंबई–मांडवा M2M फेरी सेवा सुरू; प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

July 8, 2026
8
Blog

आंबेगावच्या दुग्धभेसळ प्रकरणाविरोधात मंचरमध्ये उद्या भव्य एल्गार मोर्चा

July 8, 2026
1
Next Post

ग्रामसेवकाच्या निलंबनाच्या मागणीसाठी आडगावमध्ये आमरण उपोषण; गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक

ताज्या बातम्या

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

July 8, 2026

देवगाव शनी गायरान प्रकरणी रवींद्र पवार यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In